Dale Steyn | नववर्षाच्या सुरुवातीला आफ्रिकेच्या ‘स्टेन गन’ची मोठी घोषणा, आयपीएलमध्ये खेळणार नाही

आफ्रिकेचा स्टार गोलंदाज डेल स्टेनने मोठा निर्णय घेतला आहे. स्टेनने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

Dale Steyn | नववर्षाच्या सुरुवातीला आफ्रिकेच्या 'स्टेन गन'ची मोठी घोषणा, आयपीएलमध्ये खेळणार नाही
डेल स्टेनचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 5:46 PM

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने  (Dale Steyn) नववर्षाच्या सुरुवातीला मोठा निर्णय घेतला आहे. स्टेनने आगामी आयपीएलच्या 14 व्या मोसमात (IPL 2021) न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेनने स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. वैयक्तिक कारणांमुळे खेळणार नसल्याचं स्टेनने म्हटलं आहे. (south africa  faster bowler dale styen will not play in ipl 2021)

काय म्हटलंय ट्विटमध्ये ?

मी सर्वांना एक संदेश देऊ इच्छितो. मी आयपीएलच्या आगामी मोसमात रॉयल चॅलेंजर्ससाठी उपलब्ध नसेन. मी या कालावधीत दुसऱ्या स्पर्धेत खेळण्याचा विचार करत आहे. तसेच बंगळुरु टीम मॅनेजमेंटने मला समजून घेतलं आणि सहकार्य केलंत. त्यासाठी मी आभारी आहे, असं ट्विट स्टेनने केलं आहे.

स्टेनच्या ट्विटला RCBचं उत्तर

स्टनेच्या ट्विटला आरसीबीने उत्तर दिलं. संघात तुझी उणीव भासेल, असं भावनिक उत्तर आरसीबीने दिलं आहे.

स्टेनला आयपीएलच्या 13 व्या मोसमात लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. स्टेनने या 13 व्या मोसमात एकूण 3 सामन्यात केवळ 1 विकेट घेता आली.

डेल स्टेनची आयपीएल कारकिर्द

डेल स्टेनने आयपीएलमध्ये एकूण 95 सामने खेळला. या 95 सामन्यांमध्ये त्याने 25.85 च्या सरासरीने आणि 6.91 या इकॉनॉमी रेटने एकूण 97 विकेट्स घेतल्या. 8 धावा देऊन 3 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली.

स्टेनने ऑगस्ट 2019 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. स्टेनने एकूण 93 कसोटींमध्ये 439 विकेट्स घेतल्या. कसोटीमधून निवृत्ती घेतल्यानंतर स्टेन आफ्रिकेसाठी एकदिवसीय आणि टी 20 क्रिकेटमध्ये खेळतोय.

संबंधित बातम्या :

भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी द. आफ्रिकेला धक्का, डेल स्टेन विश्वचषकातून बाहेर

(south africa  faster bowler dale styen will not play in ipl 2021)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.