IPL 2019: आयपीएल विजयानंतर पत्नी रितिकाचे रोहितला 3 प्रश्न
IPL 2019 मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 1 धावाने पराभव केला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माची पत्नी रितिकाने त्याची खास मुलाखत घेतली. या मुलाखतीत रोहितने तिच्या प्रश्नांना अगदी मनमोकळेपणाने उत्तरे दिल्याचे पाहायला मिळाले. हैदराबाद येथील राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हा अंतिम सामना खेळला गेला. रितिकाने […]
IPL 2019 मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 1 धावाने पराभव केला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माची पत्नी रितिकाने त्याची खास मुलाखत घेतली. या मुलाखतीत रोहितने तिच्या प्रश्नांना अगदी मनमोकळेपणाने उत्तरे दिल्याचे पाहायला मिळाले. हैदराबाद येथील राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हा अंतिम सामना खेळला गेला.
रितिकाने रोहितला विचारले, “आपली मुलगी समायराच्या समोर चौथ्यांदा आयपीएलचा चॅम्पियन होताना तुला कसे वाटते?” यावर रोहित म्हणाला, “फक्त समायराच नाही, तर तुझ्यासमोरही हा चषक जिंकताना खूप चांगले वाटले. समायरासाठी हा पहिला आयपीएल चषक होता. ती सामना सुरु असताना स्टेडियमवर हजर असल्याने मला खूप आनंद मिळाला.”
रितिकाने पुढे विचारले, “शेवटच्या षटकात तुझ्या ह्रदयाचे ठोके वाढले होते का? कारण मी शेवटचे षटक पाहिलेच नाही. मला आता आठवतही नाही की मुंबई कशी जिंकली.” यावर रोहित हसून म्हणाला, “मी असं करु शकत नाही. मला तर सर्व पहावेच लागते. मला खेळात टिकून राहावे लागते. मात्र, शेवटचे षटक खूप तणावपूर्ण होते. शेवटचे षटक कसे असते हे आम्हाला माहिती होते. मला 2017 चा अंतिम सामना आठवत होता. त्यावेळी आम्ही शेवटच्या षटकात 9 ते 10 धावा वाचवल्या होत्या. त्यावेळी आमच्याकडे मिचेल जॉन्सन सारखा खेळाडू होता. यावेळी ते काम मलिंगाने केले”
या छोट्याशा मुलाखतीनंतर रितिकाने रोहितचे अभिनंदन केले, त्यावर रोहितने स्माईल देत अगदी प्रेमळपणे थँक्यू म्हटले.
दरम्यान, आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबईने 8 विकेट गमावत चेन्नई सुपर किंग्जसमोर 150 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात उतरलेल्या चेन्नईनेही चांगली सुरुवात केली. मात्र, त्यांना या खेळीचे रुपांतर विजयात करता आले नाही. चेन्नईने 20 षटकात 7 बाद 147 धावा केल्या. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर मलिंगाने मुंबईला विजय मिळवून दिला. चेन्नईकडून शेन वॉटसनने एकाकी झुंज देत 59 बॉलमध्ये धडाकेबाज 80 धावा केल्या. यात त्याच्या 4 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये दोन धावा घेण्याच्या प्रयत्न तो धावबाद झाला आणि चेन्नईच्या हातातोंडाशी आलेली मॅच मुंबईकडे झुकली. या विजयासह मुंबईने 4 आयपीएल चषकांवर आपले नाव कोरले आहे.
.@ImRo45 talks to @ritssajdeh about a ‘flashback’ to the 2017 final as things got tight in @mipaltan‘s narrow win. Watch him reveal why the 4th #VIVOIPL ? felt sweeter! #MIvCSK By @RajalArora and @28anand.
Full video ? – https://t.co/y4lTmLBUYM pic.twitter.com/wLrkSEDR0Y
— IndianPremierLeague (@IPL) May 13, 2019