Special Story : ऑस्ट्रेलियाचं ‘बाऊन्सर अस्त्र’ भारताने त्यांच्यावरच उलटवलं, वाचा टीम इंडियाच्या विजयाची इनसाईड स्टोरी…

कसोटी सामन्यात विजय मिळवायचा असेल तर गोलंदाजांना 20 विकेटस घ्याव्या लागतात. भारताच्या नवख्या गोलंदाजांनी चौथ्या कसोटीच्या दोन्ही डावात ऑस्ट्रेलियाच्या 20 विकेट घेत भारताचा विजय सोपा केला.

Special Story : ऑस्ट्रेलियाचं 'बाऊन्सर अस्त्र' भारताने त्यांच्यावरच उलटवलं, वाचा टीम इंडियाच्या विजयाची इनसाईड स्टोरी...
t natrajan, mohammad Siraj and Shardul thackur
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 6:20 AM

मुंबई : टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला (Team India Vs Australia) चौथ्या कसोटी सामन्यात ब्रिस्बेनमध्ये पराभूत करत अनेक नवे विश्वविक्रम प्रस्थापित केले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचे 9 खेळाडू जायबंदी झाले. यामध्ये भारताचे प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami), इशांत शर्मा (Ishant Sharna) आणि आर. आश्विन (R Ashwin) तिसऱ्या कसोटीत जखमी झाल्यानं अखेरच्या निर्णायक कसोटी सामन्यात खेळू शकले नाहीत. तिसऱ्या कसोटी सामन्यात सामना अनिर्णित सोडवणाऱ्या टीम इंडियासमोर गाबावरील सामना जिंकणं किंवा अनिर्णित ठेवणं हे आव्हान होतं. कसोटी सामन्यात विजय मिळवायचा असेल तर गोलंदाजांना 20 विकेटस घ्याव्या लागतात. भारताच्या नवख्या गोलंदाजांनी चौथ्या कसोटीच्या दोन्ही डावात ऑस्ट्रेलियाच्या 20 विकेट घेत भारताचा विजय सोपा केला. मोहम्मद सिराज (Mohammad Siraj), टी.नटराजन (T Natrajan), शार्दूल ठाकूर (Shardul Thackur) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांनी अफलातून कामगिरी करत ऑसी फलंदाजांना बाद करत विजयाचा पाया रचला.  (Special report On India tour Of Australia Indian bowler Excellent performance)

ऑस्ट्रेलियाचं बाऊन्सर अस्त्र भारताने त्यांच्यावरच उलटवलं

ऑस्ट्रेलिया असो की न्यूझीलंडमधील वेगवान खेळपट्ट्या असो त्यांच्या देशात ज्यावेळी मालिका असते तेव्हा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे गोलंदाज भारतीय फलंदाजांवर बाउन्सरचा मारा करतात. बाउन्सरच्या माऱ्यासमोर बहुतेक वेळा भारतीय बॅटसमनचा टिकाव लागत नाही. अखेरच्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात भारतीय गोलंदांजीनी अचूक टप्प्यावर मारा, बाउन्सर आणि वेगावर नियंत्रण ठेवत मारा केला. मोहम्मद सिराज,शार्दूल ठाकूर, टी. नटराजन यांच्या बाउन्सरसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची दाणादाण उडालेली पाहायला मिळाली. भारताच्या नवख्या गोलंदाजांनी कांगारुंच्या 20 विकेट्स घेतल्या. एक काळ होता भारतीय फलंदाजांना ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज बाउन्सरने बेजार करायचे. पण, त्याच अस्त्राचा प्रभावी वापर भारताच्या नवख्या गोलंदाजांनी केला.

t natrajan, mohammad Siraj and Shardul thackur

t natrajan, mohammad Siraj and Shardul thackur

मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव जखमी झाल्यानं सिराजला संधी

आयपीएलचा 13 वा हंगाम संपवून टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचली. पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद शमी, त्यानंतर इशांत शर्मा, उमेश यादव जखमी झाल्यानं मायदेशी परतले. भारताचा अनुभवी फिरकीपटू आर. आश्विननं हनुमा विहारीसोबत जायबंदी असतानाही तिसरा सामना वाचवून टीम इंडियाला मानसिकदृष्ट्या विजय मिळवून दिला होता. अखेरच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या आक्रमणाची धुरा मोहम्मद सिराज, टी.नटराजन शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर होती. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात टी. नटराजन, शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी तीन विकेटस घेतल्या तर मोहम्मद सिराजनं एक विकेट घेतली. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदांजांनी बॉनर्सचा मारा करुन ऑसी फलंदाजांना हैराण करुन सोडले. परिणामी मोहम्मद सिराजनं 5 विकेट, शार्दूल ठाकूरनं 4 विकेट आणि वॉशिंग्टन सुंदरनं एक बळी घेतला.

मोहम्मद सिराज

टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा हे खेळाडू जायबंदी झाल्यानं मोहम्मद सिराजला अखेरच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये संधी मिळाली. मोहम्मद सिराजनं दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये एकूण 13 विकेट घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा टीम इंडियाचा खेळाडू ठरला.

शार्दूल ठाकूर

शार्दूल ठाकूरनं पहिला सामना 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. त्यासामन्यामध्ये शार्दूलनं फक्त 10 चेंडू फेकले होते. त्यानंतर थेट ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात त्याला संधी मिळाली. शार्दूल ठाकूरनं मिळालेल्या संधींचं सोनं करुन दाखवलं. पहिल्या डावात तीन आणि दुसऱ्या डावात चार विकेट घेत शार्दूल ठाकूरनं ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अस्मान दाखवलं.

टी. नटराजन

तामिळनाडूचा गोलंदाज असलेल्या टी.नटराजननं ब्रिस्बेन कसोटीमध्ये पदार्पण केले. पहिल्याच डावात त्यानं ऑस्ट्रेलियाचं तीन फलंदाज बाद केले. टी. नटराजनच्या कामगिरीवर खूश झालेल्या तामिळनाडूच्या जनतेने त्याचं जल्लोषात स्वागत केले.

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातून टीम इंडियाच्या गोलंदाजीला काय मिळालं?

टीम इंडियाकडे यापूर्वी अनिल कुंबळे, हरभजन सिंग, आर. अश्विन यांच्यासारखे दिग्गज फिरकीपटू होते. परदेशी दौऱ्यावर गेल्यानंतर भारतीय गोलंदाजीच्या वेगवान खेळपट्टीवरील मर्यादा काही वर्षापूर्वीपर्यंत दिसून यायच्या. गेल्या 20 वर्षात टीम इंडियानं आणि बीसीसीआयनं घेतलेल्या कष्टाचं फळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दिसून आलं. मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार यांच्यासारख्या पहिल्या फळीतील गोलंदाज जखमी असताना नव्या खेळाडूंनी पर्याय निर्माण केला आहे. पहिल्या फळीतील गोलंदाजांना पुढील काळात मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, टी.नटराजन चांगली साथ देऊ शकतात.

(Special report On India tour Of Australia Indian bowler Excellent performance)

हे ही वाचा

Team India | महिंद्राचा धमाका, टीम इंडियाच्या 6 खेळाडूंना भारदस्त THAR-SUV भेट देणार

Shubhman Gill | ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेतून मला खूप काही शिकायला मिळालं : शुबमन गिल

Special Story | कसोटी कर्णधार म्हणून योग्य कोण, अजिंक्य की विराट? पाहा दोघांची आकडेवारी

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.