श्रीसंतला मोठा दिलासा, आजीवन बंदी उठवली

नवी दिल्ली:  स्पॉट फिक्सिंग प्रकरणात क्रिकेटपटू एस श्रीसंतला (S Sreesanth) मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने श्रीसंतवरील आजीवन बंदी उठवली आहे. इतकंच नाही तर बीसीसीआयला तीन महिन्यात शिक्षेवर पुनर्विचार करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. यामुळे श्रीसंत पुन्हा मैदानात उतरु शकतो. बीसीसीआयने घातलेल्या आजीवन बंदीविरोधात श्रीसंतने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने बीसीसीआयला […]

श्रीसंतला मोठा दिलासा, आजीवन बंदी उठवली
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

नवी दिल्ली:  स्पॉट फिक्सिंग प्रकरणात क्रिकेटपटू एस श्रीसंतला (S Sreesanth) मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने श्रीसंतवरील आजीवन बंदी उठवली आहे. इतकंच नाही तर बीसीसीआयला तीन महिन्यात शिक्षेवर पुनर्विचार करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. यामुळे श्रीसंत पुन्हा मैदानात उतरु शकतो.

बीसीसीआयने घातलेल्या आजीवन बंदीविरोधात श्रीसंतने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने बीसीसीआयला श्रीसंतच्या शिक्षेवर पुनर्विचार करुन, तीन महिन्यात उत्तर देण्यास सांगितलं आहे.

आयपीएल 2013 मधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणात श्रीसंतला दोषी धरलं होतं. त्याच्यावर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली होती. श्रीसंतवर भ्रष्टाचार, सट्टेबाजी आणि क्रिकेट खेळावर काळा डाग लावल्याचा आरोप होता.

श्रीसंतसह अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांच्यासह स्पॉट फिक्सिंग प्रकरणात 36 आरोपींना जुलै 2015 मध्ये पटियाला हाऊस कोर्टाने दोषी ठरवलं होतं.

कोर्टाने नेमकं काय म्हटलं? सुप्रीम कोर्टाने आजच्या सुनावणीदरम्यान म्हटलं की, “बीसीसीयकडे शिस्तभंगाची कारवाई करण्याचे अधिकार आहेत. मात्र श्रीशांतवर आजीवन बंदीवर पुनर्विचार करावा. श्रीशांतची बाजू ऐकून, त्याच्या शिक्षेबाबत तीन महिन्यात निर्णय घ्यावा. आजीवन बंदी खूपच आहे”

श्रीसंतने सर्वप्रथम केरळ उच्च न्यायालयात बीसीसीआयच्या निर्णयाला आव्हान दिले होते. ज्या याचिकेवर सुनावणी करताना केरळ उच्च न्यायालयाने श्रीशांतवरील बंदी उठवली होती. मात्र बीसीसीआयने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर केरळ उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने श्रीशांतवर पुन्हा बंदीची शिक्षा लादली. याचसोबत 2015 साली दिल्लीच्या न्यायालयानेही श्रीशांतला सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले होते. त्यामुळे बीसीसीआयने आपल्यावर लादलेली आजन्म बंदीची शिक्षा ही अनाकलनीय असल्याचे श्रीशांतने म्हटले होते. मात्र बीसीसीयने बंदी कायम ठेवल्याने श्रीसंतने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. तिथे त्याला दिलासा मिळाला.

शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार.
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'.
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?.
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.