Sanath Jayasuriya : श्रीलंकेचा फलंदाज सनथ जयसूर्याचं भारतीयांना भावनिक आवाहन
Shrilanka : मागच्या चार महिन्यात श्रीलंकेतील नागरिकांचे अधिक हाल झाले आहेत
श्रीलंकेचा (Shrilanka) माजी महान फलंदाज सनथ जयसुर्या (Sanath Jayasuriya) चांगल्या फलंदाजीसाठी अधिक प्रसिद्ध होता. त्याने त्याची कारर्कीद अधिक गाजवली आहे. ज्यावेळी तो मैदानावर असायचा त्यावेळी चौफेर फटकेबाजी करुन गोलंदाजांना घाम फोडायचा. विशेष म्हणजे जयसुर्याकडे एक हाती सामना (Match) जिंकण्याची ताकद होती. मागच्या काही दिवसांपासून श्रीलंकेत प्रचंड गोंधळ सुरु असल्याचं चित्र आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून पाहिलं आहे.
श्रीलंका देश सध्या आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. श्रीलंका देशाला अनेक भारतीय पर्यटकांनी भेट दिली, तर देशाला थोडाफार हातभार लागेल. त्यामुळे अधिक भारतीय पर्यटकांनी भेट द्यावी असं भावनिक आवाहन सनथ जयसूर्याने केलं आहे.
श्रीलंका पर्यटनाचे ‘ब्रँड अॅम्बेसेडर’म्हणून सनथ जयसुर्या प्रचार करीत आहे. काल झालेल्या कार्यक्रमात त्याने जाहीरपणे आपली भूमिका मांडली. त्यामध्ये इतर देशातील पर्यकांना सुध्दा त्याने आवाहन केलं. विशेष म्हणजे जवळच्या भारत देशात लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्याने काल भावनिक आव्हान केलं आहे.
मागच्या चार महिन्यात श्रीलंकेतील नागरिकांचे अधिक हाल झाले आहेत. त्यामुळे सध्या आम्ही नव्या दिशेच्या शोधात असल्याचे जयसुर्याने स्पष्ट केले.