IPL स्थगित झाली नसती तर मीच स्पर्धा सोडली असती, चहलच्या तडकाफडकी निर्णयामागचं ‘इमोशनल’ कारण

आई बाबांना कोरोना झाल्यामुळे मी आयपीएलमधून ब्रेक घेणार होतो, असं युजवेंद्र चहलने सांगितलं. नुकतंच त्याने याबाबत भाष्य केलंय. (Star Spinner Yuzvendra Chahal Wanted to Leave Ipl 2021 Before Ipl Suspended)

IPL स्थगित झाली नसती तर मीच स्पर्धा सोडली असती, चहलच्या तडकाफडकी निर्णयामागचं 'इमोशनल' कारण
युजवेंद्र चहल
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 12:44 PM

मुंबई :  कोरोना व्हायरसने मैदानात केलेला एन्ट्रीमुळे आयपीएलचं 14 वं पर्व (IPL 2021) स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला. या दरम्यान अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली तसेच खेळाडूंच्या कुटुंबियांनाही कोरोनाची बाधा झाली. यामध्ये दिल्लीचा फिरकीपटू आर अश्विनचे (R Ashwin) कुटुंबीय आणि बंगळुरुचा फिरकीपटू युजवेंद्र चहलचे (Yuzvendra Chahal) कुटुंबीय यांना कोरोनाने ग्रासलं होतं. कुटुंबीयांच्या काळजीपोटी आर अश्विनने चौदाव्या पर्वातून माघार घेतली होती. असाच विचार मी देखील करत होतो. आई बाबांना कोरोना झाल्यामुळे मी आयपीएलमधून ब्रेक घेणार होतो, असं युजवेंद्र चहलने सांगितलं. नुकतंच त्याने याबाबत भाष्य केलंय. (Star Spinner Yuzvendra Chahal Wanted to Leave Ipl 2021 Before Ipl Suspended)

युजवेंद्र चहल काय म्हणाला?

“जर आयपीएलचं 14 पर्व स्थगित झालं नसतं तर मी आयपीएल स्पर्धा सोडली असती, असं युजवेंद्र चहलने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे. आयपीएलचं पर्व सुरु असताना माझ्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. याच दरम्यान त्यांची तब्येत खराब झाली होती. त्यांना गुरुग्रामच्या एका रुग्णालयात भरती करावं लागलं होतं. त्यामुळे मी चिंतेत होतो. आर अश्विनने जसा आयपीएलची स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला अगदी तशाच पद्धतीने मी देखील निर्णय घेण्याच्या विचारात होतो. आयपीएल स्पर्धा कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे स्थगित झाली. जर स्पर्धा स्थगित झाली नसती तर तर मी सोडली असती”, असं इमोशनल कारण चहलने सांगितलं आहे.

आई बाबांना कोरोना, आयपीएलमधून ब्रेक घेणार होतो…

“आई-बाबांना कोरोना झाल्यामुळे आणि त्यांची प्रकृती ठीक नसल्याने मी माझ्या खेळावर फोकस करू शकत नव्हतो. जेव्हा मला समजलं की आई वडिलांची तब्येत खराब आहे त्यावेळी मी आयपीएलमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. कारण माझ्या खेळावर मला कुठलंच लक्ष देता येत नव्हतं आणि शेवटी आई बाबाही एकटे होते. तीन मे रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता आणि त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी आयपीएल स्थगित झालं”, असं चहलने सांगितलं.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा संकटात होते

युजवेंद्र चहल आणि त्याची बायको धनश्री वर्मा (Dhanashree Verma ) पाठीमागच्या काही दिवसांपासून अचडणीत सापडले होते. चहलच्या आई बाबांना कोरोनाची बाधा झाली होती तर धनश्रीच्या आई आणि भावाला देखील कोरोनाची लागण झाली होती. परंतु आता दोघांच्याही कुटुंबातले सदस्य ठीक आहेत. घरातील सदस्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे युजवेंद्र आणि धनश्रीने सुटकेचा निश्वास सोडलाय.

(Star Spinner Yuzvendra Chahal Wanted to Leave Ipl 2021 Before Ipl Suspended)

हे ही वाचा :

बॅट्समन नवऱ्याची ऑलराऊंडर पत्नी, व्हॅलेंटाईनदिनी खास मुलाखत, ‘क्रिकेट प्रेम आणि बरंच काही’!

‘कुठंबी शिरतोय, धिंगाणा करतोय…’, विराटसेनेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा, वाचा खास रेकॉर्ड!

WTC Final : विल्यमसनने एका झटक्यात तोडलं होतं विराटचं हृदय, कोहलीच्या जखमा अजूनही ताज्या, आता व्याजासकट परतफेड?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.