वर्ल्डकपआधीच स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियन संघात परतणार?

मुंबई : बॉल टेम्परिंगच्या वादात गेली 11 महिने संघातून बाहेर असलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टीव्ह स्मिथ याच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. लवकरच स्मिथ ऑस्ट्रेलियन संघात खेळणार आहे. आगामी बांगलदेश दौऱ्यात स्टीव्ह स्मिथला खेळवले जाणार होते. मात्र, दुखापतीच्या कारणामुळे स्मिथला बांगलादेश प्रीमियर लीगमधून बाहेर पडावं लागलं. त्यामुळे स्मिथचा संघातील पुनरागमन लांबलं आहे. मात्र, पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या […]

वर्ल्डकपआधीच स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियन संघात परतणार?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

मुंबई : बॉल टेम्परिंगच्या वादात गेली 11 महिने संघातून बाहेर असलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टीव्ह स्मिथ याच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. लवकरच स्मिथ ऑस्ट्रेलियन संघात खेळणार आहे. आगामी बांगलदेश दौऱ्यात स्टीव्ह स्मिथला खेळवले जाणार होते. मात्र, दुखापतीच्या कारणामुळे स्मिथला बांगलादेश प्रीमियर लीगमधून बाहेर पडावं लागलं. त्यामुळे स्मिथचा संघातील पुनरागमन लांबलं आहे. मात्र, पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या आयपीएल आणि त्यानंतर सुरु होणाऱ्या वर्ल्डकपआधीच स्मिथ ऑस्ट्रेलियन संघात परतणार आहे.

आगामी वर्ल्डकप आणि आयपीएलमध्ये खेळण्यासाठी स्मिथ तयार होत आहे, असे ऑस्ट्रेलियन संघाच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं आहे. स्मिथला झालेल्या दुखापतीतून तो लवकरच ठीक होईल आणि आतापर्यंत त्याच्या दुखापतीमध्ये सुधारणाही होत असल्याचं सांगितलं जात आहे.

स्मिथच्या हाताला लावलेले सपोर्ट काढले जात नाही, तोपर्यंत काही सांगता येत नाही. मात्र, स्टिव्ह स्मिथचे मॅनेजर वॅरेन क्रेग यांच्या माहितीनुसार,  पूर्णपणे ठीक होण्यासाठी साडेतीन आठवडे लागतील.

गेल्या वर्षी बॉल टेम्परिंगच्या वादामुळे स्टिव्ह स्मिथसोबत डेव्हिड वॉर्नर आणि बॅनक्राफ्ट यांच्यावरही संघात खेळण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. बॅनक्राफ्टवर लावण्यात आलेली बंदी संपली असली, तरी स्मिथ आणि डेव्हिडवर लावण्यात आलेली बंदी येत्या 29 मार्चला संपणार आहे.

ऑस्ट्रेलिया संघाला आपल्या दोन्ही दिग्गज खेळाडूंना बाहेर ठेवावे लागल्यामुळे संघाला अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं. गेल्या सोमवारी ऑस्ट्रेलियाचे कर्णधार टीम पेन यांनी म्हटलं की, आम्हाला आशा आहे की, हे दोघे यावर्षी अॅशेसमध्ये संघासाठी महत्त्वाची कामगिरी बजावतील. शिवाय, त्यांच्यावरील बंदी लवकरच संपेल आणि ते दोघं संघात परततील तसेच संघाला कसोटी सामन्यात विजय मिळवून देतील.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.