FIFA World Cup 2022 : सौदी अरेबियात देशभर जल्लोष, विजयानंतर मोठा निर्णय घेतल्याने देशवासियांकडून कौतुक
ऐतिहासिक विजयानंतर सौदी अरेबिया देशाने घेतला मोठा निर्णय, देशभर आनंदाच वातावरण
मुंबई : फिफा विश्वचषक (FIFA World Cup 2022) सुरु झाल्यापासून जगभरातल्या चाहत्यांचं (Fan) प्रत्येक मॅचवरती लक्ष आहे. विशेष म्हणजे अनेक चाहते सामने पाहण्यासाठी कतारमध्ये (Qatar)पोहोचले आहेत. खेळाडूंनी कतारमधील समुद्र किनाऱ्यावरील अलिशान जहाज बुक केल्या असून तिथं मित्र परिवारांसह मुक्काम केला आहे. काल सौदी अरेबिया टीमने अर्जेंटीना टीमचा पराभव केल्यानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरणं होतं. तिथल्या सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
सौदी अरेबिया टीमने अर्जेंटीना टीमचा पराभव केल्यानंतर देशात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांचा आनंदाला अधिक उधान आलं आहे. सौदी अरेबिया आणि अर्जेंटीना यांच्यात 2-1 अशी मॅच झाली.
कालच्या विजयानंतर सौदी अरेबियाचे चाहते एकदम खूष झाले आहेत. एक चाहता म्हणाला की, सौदी अरेबिया टीमने सांघिक खेळ केला. परंतु अर्जेंटीनाची टीम एका खेळाडूवर अवलंबून होती.
कालची मॅच झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी विजयानंतर जोरदार जल्लोष केल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे.
सौदी अरेबियाच्या विजयाचे नायक सालेह अलशेहरी आणि सालेम अल-दवसारी आहेत. दोन खेळाडूंनी प्रत्येक एक-एक गोल केला. त्यामुळे सौदी अरेबियाचा विजय झाला. अर्जेंटिनाकडून कर्णधार लिओनेल मेस्सीने एक गोल केला. कालच्या ऐतिहासिक विजयानंतर सौदी अरेबियात जल्लोषाचं वातावरण आहे.