भारताचं एक रनमशीन, ज्याचं करिअर सचिन, गांगुली, द्रविड, लक्ष्मणमुळे संपलं, पहिल्या मॅचमध्ये तर कमाल करुनही फायदा नाही

भारताचा एक असा रनमशीन खेळाडू की ज्याच्या तंत्रशुद्ध फलंदाजीने अनेकांचे डोळे दिपले. बहुतेकांना त्याच्यासारखे शॉट्स खेळायची स्वप्न पडली. पण त्या खेळाडूची क्रिकेट कारकीर्द मात्र झाकोळली गेली ती सचिन-गांगुली-द्रविड आणि लक्ष्णमुळे... Subramaniam Badrinath

भारताचं एक रनमशीन, ज्याचं करिअर सचिन, गांगुली, द्रविड, लक्ष्मणमुळे संपलं, पहिल्या मॅचमध्ये तर कमाल करुनही फायदा नाही
S badrinath
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 11:44 AM

मुंबई :  भारताचा (indian team) एक असा रनमशीन खेळाडू की ज्याच्या तंत्रशुद्ध फलंदाजीने अनेकांचे डोळे दिपले. बहुतेकांना त्याच्यासारखे शॉट्स खेळायची स्वप्न पडली. पण त्या खेळाडूची क्रिकेट कारकीर्द मात्र झाकोळली गेली ती सचिन-गांगुली-द्रविड आणि लक्ष्णमुळे… या चौघाच्या खेळाने त्याचं क्रिकेट आणि शॉट्स मागे पडले. साहजिक त्याला भारतीय संघात खेळण्याचं कमी स्थान मिळालं (less chance to play). तो खेळाडू म्हणजे सुब्रमण्यम बद्रीनाथ…. (Subramaniam Badrinath Indian team got less chances to play)

मिस्टर डिफेंडेबल अशी बद्रीनाथची ओळख

सुब्रमण्यम बद्रीनाथ हा मुळचा तमिळनाडूचा… त्याला मिस्टर डिफेंडेबल म्हटलं जायचं. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने 10 हजारांहून अधिक धावा केल्या. तर आपल्या बॅटिंगने आयपीएलही त्याने गाजवली. लागोपाठ दोन हंगाम आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नईकडून त्याला खेळण्याची संधी मिळाली. या संघात जागा मिळेल तिथे तो खेळला आणि चेन्नईसाठी रन्स काढले. मात्र भारताकडून खेळण्याची त्याला खूप कमी संधी मिळाली.

बद्रीनाथने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आपला जलवा दाखवला. वर्ष 2005-06 ला 7 सामन्यांत त्याने 80 च्या सरासरीने 636 धावा फटकावल्या. याच खेळीमुळे त्याला तामिळनाडूच्या संघाचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मिळाली. तरीही टीम इंडियाची कवाडे त्याच्यासाठी उघडली गेली नाहीत.

2007 ला झिम्बावे दौऱ्यावर बद्रीनाथचा भारतीय ए संघात समावेश झाला. झिम्बावे आणि केनिया दौऱ्यात त्याने आपल्या फलंदाजीची मोहर उमटवली. अशातच 2007 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली. या संघात बद्रीनाथला जागा मिळाली. परंतु संपूर्ण मालिकेत त्याला डगआऊटमध्येच बसून रहावं लागलं कारण प्रत्यक्ष प्लेइंग 11 मध्ये त्याचा समावेश होऊ शकला नाही.

तिन्ही फॉरमॅटमधला डेब्यू अविस्मरणीय

बद्रीनाथचं तिन्ही फॉर्मटमधलं भारतीय संघासाठीचं पदार्पण अविस्मरणीय राहिलं. कसोटीत त्याने सामन्याच्या पहिल्या डावात अर्धशतक ठोकले. एकदिवसीय सामन्यात मॅचविनिंग खेळी त्याने केली. तर टी -२० मध्यल्या पदार्पणाच्या सामन्यात तो सामनावीर ठरला.

सचिनला दुखापत, बद्रीनाथला संधी

भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी बद्रीनाथला सचिनच्या दुखापतीची वाट बघावी लागली. श्रीलंका दौऱ्यावर सचिनला दुखापत झाली. त्याच्या जागी खेळण्याची संधी बद्रीनाथला मिळाली. पहिल्याच मॅचमध्ये त्याने आपल्या बॅटिंगची जादू दाखवली. शेवटपर्यंत खेळत त्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिला. याशिवाय 2 कसोटी सामन्यांसह एकूण 10 सामन्यांत त्याला खेळण्याची त्याला संधी मिळाली. 7 वनडे खेळलेल्या बद्रीनाथने 79 रन्स केले. या सगळ्या मॅचेस त्याने विडींज आणि श्रीलंका दौऱ्यावर खेळल्या. इथल्या स्लो पीचवर रन्स करायला त्याला अडचणी आल्या. त्यामुळे 2011 ला त्याला आपल्या आयुष्यातील अखेरचा वन डे सामना खेळावा लागला.

पहिल्याच टी 20 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच….

बद्रीनाथने 2011 ला विडींजविरुद्धच्या टी 20 मध्ये 43 रन्सची खेळी केली. या खेळीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. परंतु त्यानंतर त्याने कधीच टी 20 मॅचेस खेळल्या नाहीत. सचिन गांगुली द्रविड आणि लक्ष्मण या दिग्गजांच्या उपस्थितीत मला संघात जागा मिळणे मुश्किल होते, असं त्याने एकदा म्हटलं. खरं तर त्या काळात भारतीय संघात फलंदाजाची गरज नव्हती कारण तेव्हा भारतीय संघाच तगडे फलंदाज होते.

…तर माझा संघात नक्की समावेश झाला असता

मी जर बॅटिंग करत करत बोलिंगमध्ये नशीब आजमावलं असतं तर ऑलराऊंडर म्हणून माझा संघात नक्की समावेश झाला असता, असं त्याने एकदा एका मुलाखतीत म्हटलं.

तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी बद्रीनाथची ओळख

बद्रीनाथ ज्यावेळी क्रिकेट खेळत होता त्यावेळी भारतीय संघात तगडे शॉट्स खेळणाऱ्या फलंदाजांचा दबदबा होता. त्या काळात तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी बद्रीनाथची ओळख होती. खरंतर अनुभवाच्या साथीने त्याने आपल्या भात्यात ताही नवीन शॉट्सही टाकले. बद्रीनाथ कमालीचा तंदुरुस्त फिल्डर होता. त्याच्याकडे झेल गेला तर सुटणार नाही, असा विश्वास संघ सहकाऱ्यांना आणि क्रिकेट रसिकांनाही होता.

बद्रीनाथचं क्रिकेट करिअर

फर्स्ट क्लास- 145 मॅच 10245 रन्स 32 शतक लिस्ट ए- 144 मॅच 4164 रन्स

हे ही वाचा :

IPL 2O21 | आयपीएलच्या 14 व्या मोसमाआधी RCBला मोठा धक्का, ‘या’ स्टार खेळाडूची माघार

Video : हरभजनच्या बोलिंग अॅक्शनची सेम टू सेम नक्कल, दस्तुरखुद्द भज्जीकडून सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.