कॉमेंट्रीत विराट-अनुष्काविषयी आक्षेपार्ह टिप्पणी, सुनील गावस्करांवर चाहते बरसले

कॉमेंट्री करताना अनुष्का-विराटबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने सुनील गावस्करांवर विराटचे चाहते नाराज झाले आहेत. | (Gavaskar facing criticism for comments on Virat Kohali)

कॉमेंट्रीत विराट-अनुष्काविषयी आक्षेपार्ह टिप्पणी, सुनील गावस्करांवर चाहते बरसले
Follow us
| Updated on: Sep 25, 2020 | 1:21 PM

अबुधाबी : माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावस्कर यांच्या टीपणीवर कर्णधार विराट कोहलीचे चाहते संतापले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सामन्यात कोहली अपयशी ठरला. त्यामुळे गावस्करांनी कॉमेंट्रीदरम्यान आक्षेपार्ह टीपणी केल्याने सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.   आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने गावस्कर यांना कॉमेंट्री करण्यास मज्जाव करावा अशी मागणीही विराटच्या चाहत्यांकडून केली जात आहे. तसेच टि्वटरवरही गावस्कर यांच्यावर प्रचंड टीकाही होत असल्याचं पाहायला मिळतंय. (Sunil Gavaskar facing criticism for comments on Virat Kohli and Anushka Sharma.)

पंजाबविरुद्ध गुरुवारी ( 25 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात कोहलीच्या बंगळुरुला हार पत्कारावी लागली. या सामन्यात विराट कोहलीला (Virat kohli) चांगली कामगिरी करता आली नाही. कोहली फलंदाजीतही पुरता अपयशी ठरला. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करताना विराटने पंजाबचा कर्णधार आणि शतकवीर के एल राहुलचे (K L Rahul) दोन झेलही  सोडले.

या सामन्यात राहुलने तब्बल 132 धावांची नाबाद शतकी खेळी करत बंगळुरुसमोर 206 धावांचे तगडे आव्हान उभे केले. पहिल्यांदा झेल सोडला तेव्हा राहुल 83 धावांवर खेळत होता. तर विराटने दुसऱ्यांदा झेल सोडला तेव्हा राहुलने 89 धावा केल्या होत्या. हे दोन्ही झेल विराटने सोडले नसते तर लोकेश राहुल 132 धावा करुच शकला नसता, असा सूर किक्रेट प्रेमींकडून आळवण्यात येतोय. त्याबाबत बोलताना गावस्कर यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली.

सुनील गावस्कर काय म्हणाले?

सुनील गावस्कर हे कॉमेंट्रीदरम्यान विराटच्या खेळीबद्दल बोलत होते. त्याच्या खेळीची मिमांसा करताना त्यांनी विराट-अनुष्काबद्दल (Anushka Sharma) आक्षेपार्ह टिप्पणी केली. “विराटने फक्त अनुष्काच्या गोलंदाजीचा सराव केला” त्यांच्या या टिप्पणीमुळे विराटचे चाहते नाराज झाले आहेत.

दरम्यान, गावस्कर यांच्या टिप्पणीचा चुकीचा अर्थ लावण्यात येतोय, असं त्यांचे समर्थक म्हणत आहेत. लॉकडाऊनमध्ये विराट पत्नी अनुष्कासोबत क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सुनील गावस्कर याच व्हिडिओचा संदर्भ घेऊन बोलले असतील असंही म्हटलं जातंय.(Sunil Gavaskar facing criticism for comments on Virat Kohli and Anushka Sharma.)

संबंधित बातम्या :

IPL 2020, KXIP vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची तीन प्रमुख कारणं

Virat Kohli | विराटच्या घरी नवा पाहुणा येणार, अनुष्काने दिली ‘गुड न्यूज’

IPL 2020, KXIP vs RCB Live Score Updates : किंग्ज इलेव्हन पंजाबचा बंगळुरुवर 97 धावांनी दणदणतीत विजय

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.