20 वर्षीय फलंदाजाचा शतकी दणका पाहून सुनील गावसकरांची भविष्यवाणी, म्हणाले…
IPL मध्ये गुरुवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) राजस्थानचा (Rajasthan Royals) पराभव केला होता.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमध्ये काल खेळवण्यात आलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Banglore) राजस्थान रॉयल्सवर (Rajasthan Royals) 10 विकेट्सने अफलातून विजय मिळवला आहे. राजस्थानने बंगळुरुला विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान बंगळुरने एकही विकेट न गमावता 16.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. बंगळुरुकडून देवदत्त पडीक्कलने (Devdutt Padikkal) सर्वाधिक 101 धावांची नाबाद खेळी केली. तसेच कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) नाबाद 72 धावांची अर्धशतकी खेळी केली. पडीक्कल आणि कोहली बँगलोरच्या विजयाचे शिल्पकार ठरले. (Sunil Gavaskar says Won’t be surprised if Devdutt Padikkal plays for India in any format)
देवदत्त पडीक्कलने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात 52 चेंडूत 101 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 6 षटकार ठोकले. त्याचबरोबर तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये शतक करणारा तिसरा युवा फलंदाज ठरला आहे. 20 वर्ष 289 दिवस इतकं वय असलेल्या देवदत्तने आज त्याच्या आयपीएल कारकीर्दीतलं पहिलंवहिलं शतक फटकावलं आहे. त्याच्या आधी दोन फलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करुन देवदत्तने भारतीय क्रिकेट टीमचं दार ठोठावलं आहे. त्याचबरोबर काल फटकावलेल्या शतकानंतर त्याने बीसीआयच्या निवड समितीचंदेखील लक्ष वेधून घेतलं आहे.
देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधील देवदत्तची कामगिरी पाहून महान क्रिकेटपटू सुनील गावसकर म्हणाले की, हा 20 वर्षीय खेळाडू लवकरच भारतीय संघात पाहायला मिळू शकतो. सुनील गावसकर म्हणाले की, “लवकरच तो (देवदत्त) क्रिकेटच्या कोणत्याही एका प्रकारात भारतीय क्रिकेट संघाकडून खेळताना दिसेल. टीम इंडियामध्ये त्याची निवड झाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. कारण असे करण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत आणि रणजी करंडक स्पर्धेतही त्याच्या नावावर मोठी शतकं आहेत. त्यामुळेच आगामी काळात तो टीम इंडियाकडून खेळताना दिसेल.”
कर्नाटकच्या फलंदाजांची फौज
गावसकर म्हणाले की, कर्नाटकने टीम इंडियाला नेहमीच सर्वोत्तम फलंदाज दिले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ, राहुल द्रविड आणि त्यानंतर केएल राहुल हे उत्तम फलंदाज भारतीय क्रिकेटला मिळाले आहेत. तसेच मयंक अग्रवाल आणि कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक ठोकणारा फलंदाज करुण नायरदेखील कर्नाटकचाच. याच यादीत देवदत्त पडीक्कल हे नावदेखील पाहायला मिळेल.
पडीक्कलची आतापर्यंतची IPL मधील कामगिरी
आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून सर्वात जास्त धावा देवदत्तने फटकावल्या होत्या. त्याने या बाबतीत कर्णधार विराट कोहली आणि मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्सलादेखील मागे ठेवले होते. IPL 2020 मध्ये पडीक्कलला 15 सामन्यांमध्ये आरसीबी संघाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. या 15 सामन्यांमध्ये त्याने 31.53 च्या सरासरीने आणि 124 च्या स्ट्राईक रेटने आणि 5 अर्धशतकांच्या तब्बल 473 धावा फटकावल्या होत्या.
विजय हजारे करंडक स्पर्धेतील कामगिरी
देवदत्तने नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात पृथ्वी शॉनंतर सर्वाधिक धावा चोपल्या होत्या. 20 वर्षीय देवदत्तने 7 सामन्यात 147. 4 च्या सरासरीने 737 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 शतकं आणि 3 अर्धशतकं झळकावली. विशेष म्हणजे देवदत्तने 4 शतकं सलग 4 सामन्यात लगावली. यासह देवदत्तने विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली. विराटने 2008 मध्ये हजारे करंडकात असाच कारनामा केला होता.
फॉरमॅट
|
सामने
|
डाव
|
नाबाद
|
धावा
|
हायस्कोर
|
सरासरी
|
BF
|
CT
|
SR
|
100s
|
50s
|
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
Firts Class
|
15
|
29
|
3
|
907
|
99
|
34.88
|
1794
|
6
|
50.55
|
0
|
10
|
List A
|
20
|
20
|
4
|
1387
|
152
|
86.68
|
1597
|
32
|
86.5
|
6
|
9
|
T-20
|
33
|
33
|
4
|
1271
|
122
|
43.82
|
871
|
50
|
145.92
|
1
|
11
|
संबंधित बातम्या
VIDEO | मला टॉस जिंकण्याची सवय नाही, त्यामुळे गडबड झाली, टॉसदरम्यान विराट कोहलीचा गोंधळ
IPL 2021 : VIDEO वाईडच्या आशेने बॉल सोडला, चेंडू थेट स्टम्प्समध्ये घुसला
(Sunil Gavaskar says Won’t be surprised if Devdutt Padikkal plays for India in any format)