Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH च्या चाहत्यांना ‘या’ खेळाडूला गमावण्याची भीती, कर्णधार वॉर्नरकडून दिलासा

आयपीएलच्या पुढील हंगामात आणखी एक किंवा दोन नवे संघ दिसू शकतात, नव्या संघांचा समावेश झाला तर पुढील एक-दीड महिन्यात खेळाडूंचा मोठा लिलाव होईल.

SRH च्या चाहत्यांना 'या' खेळाडूला गमावण्याची भीती, कर्णधार वॉर्नरकडून दिलासा
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 3:49 PM

मुंबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमाचा नुकताच शेवट झाला आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी आता पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या प्रतीक्षेत आहेत. यावर्षी कोरोनामुळे आयपीएलच्या 13 व्या मोसमाला जवळपास 5 महिन्यांच्या विलंबाने सुरुवात झाली. मात्र आयपीएलचा 14 व्या हंगामाची सुरुवात (IPL 2021) सालाबादप्रमाणे मार्च महिन्यातच होईल, असा आशावाद बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (BCCI President Sourav Ganguly) व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने बीसीसीआयचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, आयपीएलच्या पुढील हंगामात आणखी एक किंवा दोन नवे संघ दिसू शकतात, याबाबत बीसीसीआयच्या चर्चा सुरु आहेत. नव्या संघांचा समावेश झाला तर पुढील एक-दीड महिन्यात खेळाडूंचा मोठा लिलाव (IPL Mega Auction) होईल. त्यामुळे सध्या आयपीएलमध्ये खेळणाऱ्या फ्रेंचायझी चिंतेत आहेत. (Sunrisers Hyderabad fans asks David warner to Retain Kane Williamson for IPL 2021)

आयपीएलमध्ये नव्या संघांचा समावेश झाला तर खेळाडूंचा मोठा लिलाव होईल. दरम्यान सध्या ज्या फ्रेंचायझी आयपीएलमध्ये सहभागी आहेत, त्यांना नव्या दोन संघांचा विचार पटलेला नाही. कारण दोन नवे संघ आले तर त्यांच्याकडील सध्याचे काही खेळाडू बदलले जाऊ शकतात. प्रामुख्याने संघातील मोठे खेळाडू दुसऱ्या संघात जाऊ शकतात. त्यामुळे फ्रेंचायझींनी उभा केलेला संतुलित संघ बिघडू शकतो. शिवाय पुढील आयपीएलला फार वेळ शिल्लक नाही, नव्याने टीम उभी करण्यासाठी पुरेसा अवधी नाही.

सनरायझर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) चाहत्यांनाही अशीच चिंता सतावतेय. एसआरएचच्या चाहत्यांना वाटतं की, जर खेळाडूंचा मोठा लिलाव झाला तर त्यांच्या संघातील केन विलियमसन दुसऱ्या संघात जाऊ शकतो. याबाबत Sunrisers Hyderabad च्या चाहत्यांनी थेट कर्णधार डेव्हिड वॉर्नला इन्स्टाग्रामवर प्रश्न विचारला. त्यावर वॉर्नर म्हणाला की, “मलाही वाटतं की विलियमसन आपल्याच संघातून खेळावा. तसेच मी यासाठी पूर्ण प्रयत्न करेन की, आमचे संघमालक विलियमसनला लिलावादरम्यान रिटेन करतील”.

संघाला क्वालिफायरपर्यंत पोहोचवण्यात विलियमसनचा मोठा वाटा

न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसनने यंदा मधल्या फळीत सनरायझर्स हैदराबाद संघाची फलंदाजी पूर्णपणे सांभाळली. संघाला क्वालिफायरपर्यंत नेण्यात वॉर्नरप्रमाणे विलियमसनचंही मोठं योगदान आहे. तसेच विलियमसनच्या फलंदाजीच्या जोरावर हैदराबादच्या संघाने एलिमिनेटर साम्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाला धूळ चारली होती.

2018 च्या आयपीएलमध्ये विलियमसनने स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावत (735) ऑरेंज कॅप मिळवली होती. तर यंदा 12 सामन्यांमध्ये 11 डावात फलंदाजी करताना विलियमसनने 45.18 च्या सरासरीने 317 धावा फटकावल्या. यादरम्यान त्याने तीन अर्धशतकं ठोकली.

संबंधित बातम्या

IPL मधील संघांची संख्या वाढवण्याच्या BCCI च्या योजनेला राहुल द्रविडचं समर्थन; सांगितलं ‘कारण’

IPL 2020 | अजित आगरकरची बेस्ट प्लेईंग इलेव्हन, बुमराह, सूर्यकुमारला स्थान, मात्र रोहित, विराट बाहेर

(Sunrisers Hyderabad fans asks David warner to Retain Kane Williamson for IPL 2021)

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.