IPL 2022 | एका बाजूला पदार्पणाचा आनंद, दुसऱ्या बाजूला वाईट बातमी, सूर्यकुमार आणि इशानला मुंबईचा टाटा बायबाय

आयपीएलमध्ये (IPL) इशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे.

IPL 2022 | एका बाजूला पदार्पणाचा आनंद, दुसऱ्या बाजूला वाईट बातमी, सूर्यकुमार आणि इशानला मुंबईचा टाटा बायबाय
आयपीएलमध्ये (IPL) इशान किशन (suryakumar yadav) आणि सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे.
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 3:04 PM

अहमदाबाद : इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यातून (Ishan Kishan) इशान किशन आणि (सूर्यकुमार यादव Suryakumar Yadav) या दोघांनी पदार्पण केलं. पदार्पणातील सामन्यात इशान किशनने अर्धशतकी खेळीसह विक्रमी कामगिरी केली. तर सूर्यकुमार यादवला बॅटिंगची संधी मिळाली नाही. दोघांना आपल्या देशासाठी खेळण्याची संधी मिळाल्याने हे आनंदी होते. पण यांचा हा आनंद दिवसभर ही टीकू शकला नाही. दुधात मीठाचा खडा पडावा तसंच या दोघांसोबत झालं आहे. दोघांसाठी एक वाईट बातमी आहे. बीसीसीआय (BCCI) 2022 मध्ये आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठी (IPL Mega Auction 2022) मेगा ऑक्शनचे आयोजन करणार आहे. त्यामुळे या मेगा ऑक्शनमध्ये इशान आणि सूर्यकुमारला मुंबईकडून डच्चू मिळू शकतो. (Suryakumar Yadav and Ishan Kishan will be in IPL 2022 auction)

नक्की प्रकार काय?

हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये मुंबई इंडिन्यसचे प्रतिनिधित्व करतात. आयपीएलच्या रिटेंशन नियमांनुसार आयपीएल फ्रँचायजी 3 खेळाडूंना रिटेन (संघात कायम) करु शकते. तर राईट टु कार्डनुसार 1 परदेशी खेळाडू आणि 1 अनकॅप्ड खेळाडू (आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेला खेळाडू) कायम ठेवू शकते. त्यामुळे या नियमांनुसार मुंबई टीम जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याला कायम ठेवतील. त्यामुळे इशान किशन आणि सूर्यकुमार यादवला आपल्यासोबत कायम ठेवता येणार नाही. त्यामुळे आता गव्हर्निंग काउन्सिल या नियमांमध्ये काही बदल करते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सूर्यकुमारची आयपीएलमधील कामगिरी

सूर्यकुमार आयपीएलच्या 13 व्या मोसमात 16 सामने खेळला. या 16 सामन्यात त्याने 4 अर्धशतकांसह 480 धावा केला. आयपीएल 2019 मध्ये सूर्यकुमारने 16 सामन्यांमध्ये 424 धावा फटकावल्या होत्या. 2018 च्या आयपीएलमध्ये त्याने 14 सामन्यांमध्ये 512 धावा फटकावल्या होत्या. आयपीएलच्या 101 सामन्यांमध्ये 86 डावांत फलंदाजी करताना 30.2 च्या सरासरीने सूर्यकुमारने 2024 धावा फटकावल्या आहेत. यात 11 अर्धशतकांचा समावेश आहे.

इशान किशनची 13 व्या मोसमातील कामगिरी

इशानने 13 व्या मोसमातील 14 सामन्यातील 13 डावात बॅटिंग केली. यामध्ये त्याने 145.76 च्या स्ट्राईक रेटने तसेच 57.33 च्या सरासरीने 13 डावांमध्ये 36 चौकार आणि 30 षटकारांसह 516 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. इशानची 99 ही या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या आहे.

संबंधित बातम्या :

Video | आयपीएल गाजवणाऱ्या सूर्यकुमार यादव आणि इशान किशनचं टी 20 पदार्पण

VIDEO | कॅप्टन विराटसोबत पहिल्यांदा खेळण्याचा अनुभव कसा होता, चहलच्या प्रश्नावर इशान काय म्हणाला?

(Suryakumar Yadav and Ishan Kishan will be in IPL 2022 auction)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.