मुंबई : दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर (Chatrasal Stadium) पैलवान सागर धनखड (Sagar Dhankhar) याच्या हत्या प्रकरणात एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये पैलवान सुशील कुमारच्या (Sushil Kumar) हातात एक लाकडी दंडुका दिसत आहे. असा दावा केला जात आहे की हा व्हिडिओ तेव्हाचा आहे जेव्हा सागर धनखडची हत्या केली गेली. व्हिडिओमध्ये सुशील कुमार सागर धनखड, सोनू महल आणि त्याच्या मित्रांना मारहाण करताना दिसत आहे. आता हा व्हिडिओ पुरावा म्हणून पोलिसांकडे उपलब्ध आहे. (Sushil Kumar With Stick beating Sagar Dhankhar Video Viral)
त्याचबरोबर टीव्ही 9 जवळही असा एक फोटो आहे ज्यामध्ये सुशील कुमारच्या हातात दंडुका आहे. हा फोटो 4 मेच्या रात्रीचा असल्याची शक्यता आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये छत्रसाल स्टेडियममध्ये बर्याच लोकांची गर्दी दिसत आहे. त्याचवेळी व्हिडिओमध्ये सुशील कुमार देखील स्पष्टपणे दिसत आहे. दुसरीकडे, जमिनीवर पडलेला सागर धनकड सुशील कुमारसमोर विनवणी करत हात जोडताना दिसून येतोय. तरीदेखील सुशील कुमार त्याला एखाद्या प्राण्यासारखा मारतोय.
व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या हातात रिवॉल्वर किंवा कट्टा यासारखं शस्त्र दिसत आहे. इतकंच नाही तर काळा असौदा गँग आणि नीरज बावनिया गँगचे काही बदमाश देखील दिसून येत आहेत. या सर्व गुंडांच्या हातात लाकडी दांडके आणि आणखी बऱ्याच लाठ्या-काठ्या दिसून येत आहेत. समोर आलेल्या व्हिडिओत सुशील कुमार सागर धनकड आणि त्याच्या एका साथीदाराला मारहाण करत आहे.
त्याचवेळी व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या वाहनांवरही पोलिसांचा संशय आहे की ही वाहनं टोळीतील गुंडांचीच आहेत. विशेष म्हणजे फॉरेन्सिक तपासणीत हा व्हिडिओ खरा मानला गेलाय. या व्हिडीओत कोणत्याही प्रकारची छेडछाड झालेली नाही, असंही समोर आलं आहे.
चौकशीदरम्यान पोलिसांनी सुशील कुमारला हा व्हिडिओ दाखविला. ज्यामध्ये तो हातात काठी घेऊन सागर धनखडवर हल्ला करत आहे. व्हिडिओ पाहून सुशील चकित झाला. रिपोर्टनुसार सुशील कुमारने गुन्हे शाखेला दिलेल्या माहितीत घटनेच्या रात्री दोन गट एकमेकांशी भांडत होते. त्यानंतर रात्री 9.30 च्या सुमारास सुशीलचा ग्रुप स्टेडियमच्या बाहेर गेला.
(Sushil Kumar With Stick beating Sagar Dhankhar Video Viral)
हे ही वाचा :
सागर धनखड हत्या : पैलवान सुशीलकुमारला मोठा झटका, रेल्वेतून हकालपट्टी, नोकरी गमावली!
कुस्तीत दोनदा ऑलिम्पिक, आडदांड पैलवानांना लोळवलं; पण पोलिसांचा खाक्या बसताच सुशील कुमार रडला
हत्या प्रकरणात शिक्षा झाल्यास सुशील कुमारची ऑलिम्पिक पदकं काढली जाणार? वाचा सविस्तर