विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून बाहेर; कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे म्हणाला, एक खेळाडूच…

Swapnil Kusale on Vinesh Phogat Disqualification : केवळ 100 ग्रॅम अतिरिक्त वजनामुळे विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून बाहेर निघावं लागलं. यावर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे यानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर......

विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून बाहेर; कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे म्हणाला, एक खेळाडूच...
विनेश फोगाट, स्वप्निल कुसाळेImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Aug 08, 2024 | 7:27 PM

100 ग्रॅम अतिरिक्त वजन विनेशने केलेल्या कामगिरीवर भारी पडलं. 50 किलो वजनी गटातून खेळत असताना कुस्तीपटू विनेश फोगाटला स्पर्धेतून बाहेर केलं गेलं. त्याला कारण ठरलं ते 100 ग्रॅम अतिरिक्त वजन… विनेशचं वजन 50 किलोच्या आत असणं अपेक्षित होतं. पण 50 किलो 100 ग्रॅम विनेशचं वजन भरलं. त्यामुळे फायनल खेळण्याआधीच विनेश स्पर्धेतून बाहेर झाली. यावर वेगवेगळ्या स्तरातून देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. नेमबाजीत कांस्यपदक मिळवणारा नेमबाज स्वप्नील कुसाळे याने विनेशच्या अपात्रतेवर प्रतिक्रिया दिली आहे. विनेश फोगाट सध्या काय परिस्थितीतून जात असेल, हा एक खेळाडूच समजू शकतो. खेळाडू म्हणून विनेश फोगटसाठी वाईट वाटत आहे, असं स्वप्नील म्हणाला.

मेडल माझं नव्हे देशाचं…- स्वप्नील

महाराष्ट्राच्या मातीत चांगले खेळाडू घडतात. हे मेडल एकट्या माझं नाही तर देशाचे आहे. खेळात प्रेशर हॅण्डल करणं महत्वाचे असतं ते मी केलं. देशासाठी गोल्ड मेडल मिळवण्यासाठी अजून खेळायचं आहे आणि देशासाठी गोल्ड मेडल मिळवून द्यायचं आहे. क्रीडाप्रबोधिनी नाशिकमधून माझी शूटिंगची सुरुवात झाली. मी स्वतः च स्वतः चा हिरो आहे, असं स्वप्निल कुसाळे म्हणाला.

कोल्हापूरला जाण्याची उत्सुकता आहे. अनेक दिवस झालं घरी गेलो नाही. पण परत सुरुवात करावी लागणार आहे. मला गोड खायला आवडतं. मी कितीतरी दिवस झालं दूध घेतलं नाही. ज्यामुळे त्रास होतो. खाण्या पिण्यावर बंधने आली. गेल्या वेळी स्पर्धेत त्रास झाला होता. कोल्हापूरला जाऊन देवीचं दर्शन घेणार आहे. मी स्वतः शरीरावर लक्ष ठेवून होतो. कारण शरीर जर साथ देत असेल तर सगळं चांगलं होतं. माझ्या ड्रीमसाठी खेळत आहे. मी.कमी पडलो आहे गोल्ड मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असं स्वप्निलने सांगितलं आहे.

“माझी स्वप्न इथंच संपत नाही”

माझी स्वप्न इथंच संपलं नाही. मला देशासाठी गोल्ड आणायचं आहे. आता मला आनंद आहे की देशासाठी पदक जिंकू शकलो पण गोल्ड मेडल जिंकायचं आहे. मी त्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे. आज मायदेशी परतलो आनंद वाटला सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आहे. सगळ्यांचे आभार… यापुढेही देशासाठी खेळत राहणार आहे, असं स्वप्नील कुसाळे म्हणाला.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.