Mumbai vs Haryana | अर्जुन तेंडुलकर शून्यावर बाद, गोलंदाजीही चोपली, 3 ओव्हरमध्ये धावांचा पाऊस

मुंबईचा हा सलग तिसरा पराभव ठरला आहे.

Mumbai vs Haryana | अर्जुन तेंडुलकर शून्यावर बाद, गोलंदाजीही चोपली, 3 ओव्हरमध्ये धावांचा पाऊस
अर्जुन तेंडुलकर
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 6:00 PM

मुंबई: हरियाणाने मुंबईवर 8 विकेट्सने शानदार विजय (Mumbai vs Haryana) मिळवला आहे. यासह हरियाणाने विजयाची हॅट्रिक पूर्ण केली आहे. तर मुंबईचा हा सलग तिसरा पराभव ठरला आहे. मुंबईने हरियाणाला विजयासाठी 144 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान हरियाणाने 2 विकेट्स गमावून 14 चेंडूआधी पूर्ण केलं. हरियाणाकडून हिमांशू राणाने नाबाद 75 धावांची विजयी खेळी केली. तर शिवम चौहाननेही नाबाद 43 धावांची खेळी केली. मुंबईकडून पदार्पण केलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar)  आणि शम्स मुलानीने प्रत्येकी 1 विकेट घेतला. (syed mushtaq ali t20 trophy 2021 haryana beat mumbai by 8 wickets)

हरियाणा विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आली. हरियाणाची सावध सुरुवात राहिली. मात्र त्यानंतर हरियाणाने लवकर 2 विकेट्स गमावल्या. अरुण चप्रना 19 धावावंर बाद झाला. तर चैतन्य बिश्नोई 4 धावांवर बाद झाला. यामुळे हरयाणाची 27-2 अशी स्थिती झाली.

विजयी शतकी भागीदारी

यानंतर हिमांशू राणा आणि शिवम चौहान या दोघांनी हरियाणाचा विजयाचा पाया रचला. या दोघांनी मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनीही जोरदार फटकेबाजी केली. यादरम्यान हिमांशू राणाने आपले अर्धशतक पूर्ण केलं. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 117 धावांची भागीदारी केली. हिमांशूने 53 चेंडूत 9 फोर आणि 3 सिक्ससह नाबाद 75 धावा केल्या. तर शिवम चौहानने 37 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 43 धावांची खेळी केली.

मुंबईची फलंदाजी

त्याआधी मुंबईने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईची चांगली सुरुवात झाली. यशस्वी जयस्वाल आणि आदित्य तरे या सलामी जोडीने 37 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र यानंतर तरे 8 धावांवर बाद झाला. पहिली विकेट गमाल्यानंतर मुंबईने एकामागोमाग एक विकेट्स गमावल्या. मुंबईच्या 4 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. तर 2 फलंदाजांना दुहेरी आकडा गाठण्यास अपयश आले. मुंबईकडून सलामीवीर यशस्वी जयस्वालने 35 धावा केल्या. अर्थव अंकोलेकरने 37 धावांची खेळी केली. तर सरफराज खानने 30 धावा केल्या. या तिघांच्या खेळीमुळे मुंबईला सर्वबाद 143 धावा करता आल्या.

हरियाणाची शानदार गोलंदाजी

हरियाणाकडून गोंलदाजांनी चांगली कामगिरी केली. जयंत यादवने 4 ओव्हर्समध्ये 22 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तर अरुण चोप्राने 3 फलंदाजांना बाद केलं. तसेच फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि राहुल तेवतिया या जोडीने प्रत्येकी 1 विकेट घेतला.

मुंबईचा सलग तिसरा पराभव

हरियाणाविरोधात मुंबईला 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. यासह मुंबईचा हा सलग तिसरा पराभव ठरला. याआधी दिल्ली आणि केरळने मुंबईवर मात केली होती.

अर्जून तेंडुलकरची निराशाजनक कामगिरी

अर्जून तेंडुलकरने हरियाणाविरोधातील या सामन्यातून पदार्पण केलं. मुंबईचा याआधीच्या 2 सामन्यात पराभव झाला होत. अर्जुनकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा होती. मात्र त्यानेही निराशा केली. प्रथम बॅटिंग करताना अर्जुन डायमंड डक ( diamond duck)झाला. म्हणजेच एकही चेंडू न खेळता तो रनआऊट झाला. गोलंदाजी करताना त्याने 1 विकेट घेतला. पण त्याने 3 ओव्हर्समध्ये 11 पेक्षा अधिकच्या इकोनॉमी रेटने 34 धावा लुटवल्या. तसेच एक कॅचही त्याने सोडला.

मुंबईचे आव्हान जवळपास संपुष्टात

मुंबईने सलग 3 सामने गमावले आहेत. तर आता 2 सामने उर्वरित आहेत. हे उर्वरित सामने पॉंडेचरी आणि आंध्र प्रदेशविरोधात खेळण्यात येणार आहेत. मात्र मुंबईचे सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टत आल्याचं म्हटलं जात आहे.

संबंधित बातम्या :

Syed mushtaq ali trophy 2021 | अर्जुन तेंडुलकरचे मुंबईच्या सिनिअर टीममधून पदार्पण, जुळून आला योगायोग

(syed mushtaq ali t20 trophy 2021 haryana beat mumbai by 8 wickets)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.