मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar Make his Debut Against Haryana) मुंबईच्या सिनिअर टीममधून (Mumbai Cricket Team) पदार्पण केलं आहे. सय्यद मुश्ताक अली करंडकातील (Syed Mushtaq Ali Trophy 2021) हरयाणाविरोधातील सामन्यातून अर्जुनने पदार्पण केलं आहे. अर्जूनला सिनिअर टीममध्ये संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. अर्जूनची काही दिवसांपूर्वीच सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी मुंबई संघात निवड करण्यात आली होती. (syed mushtaq ali trophy 2021 arjun tendulkar makes his debut on mumbai senior team)
अर्जूनला पहिल्या 2 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. यामुळे त्याला बाहेर बसावे लागले. या पहिल्या 2 सामन्यात मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईच्या गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे अर्जूनकडून या सामन्यात बोलिंगनेही चांगल्या कामगिरीची अपेक्ष असणार आहे. यामुळे अर्जुनच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
अर्जुनने हरयाणाविरोधात पदार्पण केलं आहे. यासह एक भन्नाट योगायोग जुळून आला आहे. सचिन तेंडुलकरने डोमेस्टेक क्रिकेटमधील अखेरचा सामना हा हरयाणाविरोधात खेळला होता. तर आता 8 वर्षानंतर अर्जुन हरयाणाविरोधात पदार्पण करत आहे. यामुळे पिता पुत्रांचा 8 वर्षानंतर हरयाणाविरोधातील योगायोग जुळून आला आहे.
अर्जुन टीम इंडियाच्या नेट्समध्येही गोलंदाजीही केली आहे. अर्जुनने 2017 मध्ये इंग्लंडच्या सिनिअर टीमसोबच सराव केला होता. यावेळेस त्याने अचूक आणि भेदक गोलंदाजी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अर्जुन आतापर्यंत विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये मुंबईकडून खेळला आहे. अर्जुनने 2018 मध्ये अंडर 19 स्पर्धेत टीम इंडियाकडून पदार्पण केलं होतं. तसेच श्रीलंकाविरोधातील 19 वर्षाखालील युवा कसोटी मालिकेतही समावेश करण्यात आला होता.
अशी आहे मुंबईची टीम : सुर्यकुमार यादव ( कर्णधार), आदित्य तरे ( उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अर्जुन तेंडुलकर, आकर्षित गोमेल, सरफराज खान, सिद्धेश लाड, शिवम दुबे, शुभम रांजणे, सुजित नायक, साईराज पाटील, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, मिनाद मांजरेकर, प्रथमेश डाके, अथर्व अंकोलेकर, शशांक अत्तारडे, शम्स मुलाणी, हार्दिक तामोरे, आकाश पारकर आणि सुफीयां शेख.
संबंधित बातम्या :
Syed Mushtaq Ali Trophy साठी मुंबईची घोषणा, सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व
(syed mushtaq ali trophy 2021 arjun tendulkar makes his debut on mumbai senior team)