T20 world cup 2022: ज्याच्याकडून न्यूझीलंडला सर्वाधिक आशा होत्या, त्यानेचं दगा दिला
पाकिस्तानच्या सगळ्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली.
सिडनी : विश्वचषक स्पर्धेत (T20 world cup 2022) सेमीफायनलची आज पहिली मॅच सुरु आहे. आज पाकिस्तान (pakistan) आणि न्यूझिलंड (NZ)यांच्यातला महामुकाबला सिडनीच्या मैदानात सुरु आहे. विशेष म्हणजे आज फिन एलन या न्यूझिलंडच्या फलंदाजाकडून टीम अधिक अपेक्षा होत्या. पण शाहीन आफ्रीदीने त्याची विकेट घेतली आणि चाहते निराश झाले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फिन एलन या फलंदाजाने तुफान खेळी केली होती, त्यामुळे आजच्या सामन्यात त्यांच्याकडून टीमला मोठ्या अपेक्षा होत्या.
आजच्या मॅचमध्ये न्यूझिलंडचे गोलंदाज कशी कामगिरी करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. न्यूझिलंडच्या कोणत्याही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आलेली नाही. आजच्या मॅच फिन एलननं फक्त 4 धावा केल्या.
Shaheen Shah Afridi strikes, he gets the danger-man Allen for 4.
— Johns. (@CricCrazyJohns) November 9, 2022
पाकिस्तानच्या सगळ्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली. त्यामुळे न्यूझिलंडच्या खेळाडूंना मोठे फटके मारता आले नाहीत. सुरुवातीपासून विकेट पडत असल्यामुळे न्यूझिलंडची फलंदाजी पुर्णपणे दबावाखाली झाली आहे.
First ball: FOUR Second ball: LBW given, review successful Third ball: LBW given, review unsuccessful
Box-office stuff so far, Shaheen Shah Afridi gets Finn Allen #NZvPAK #T20WorldCup
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 9, 2022
पाकिस्तानची प्लेइंग इलेवन
मोहम्मद रिजवान, बाबर आजम, मोहम्मद हारिस, शान मसूद, शादाब खान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, नसीम शाह, हॅरिस रौफ, शाहीन आफ्रिदी.
न्यूजीलंडची प्लेइंग इलेवन
फिन एलेन, डेवन कॉन्वे, केन विलियमसन, ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिचेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउदी, इश सोढ़ी, लॉकी फर्गुसन, ट्रेंट बोल्ट