T20 WC: फिंच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, IND vs PAK मॅच पाहण्याची संधी मला गमवायची नाही
ज्यावेळी टीम इंडिया आणि पाकिस्तानची मॅच सुरु होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार त्यांच्या ऑस्ट्रेलियातील घरी होता.
मेलबर्न : मागच्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलिया टीमचा कर्णधार अॅरोन फिंच (aaron finch) निवृत्ती घेणार अशी चर्चा सुरु आहे. T20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धा संपल्यानंतर अनेक खेळाडू निवृत्ती घेण्याच्या तयारी असल्याची माहिती मिळाली आहे. कर्णधार अॅरोन फिंचला टीम इंडिया (IND) आणि पाकिस्तानचा (PAK) झालेला रोमांचक सामना अधिक आवडला. त्याला टीम इंडिया आणि पाकिस्तानचे यापुढचे सगळे सामना स्टेडियममध्ये प्रेक्षकांमध्ये बसून पाहायचे आहेत. त्यामुळे फिंच निवृत्ती घेण्याच्या तयारीत असल्याचं चर्चा सुरु झाली आहे.
ज्यावेळी टीम इंडिया आणि पाकिस्तानची मॅच सुरु होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार त्यांच्या ऑस्ट्रेलियातील घरी होता. घरातून मॅच पाहत असताना तो अधिक घाबरला होता. कारण मॅच अधिक रोमांचक सुरु होती. त्यावेळी कोणाचा विजय होईल हे निश्चित सांगता येत नव्हतं. मुळात खरंतर हा सामना मला प्रेक्षकांमध्ये बसून पाहायचा होता असं अॅरोन फिंचने दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
विराट कोहलीच्या नाबाद खेळीचं देखील अॅरोन फिंचने कौतुक केलं. विराट कोहलीचा हा मास्टरक्लास होता असं देखील तो म्हणाला. शेवटच्या तीन ओव्हरमध्ये टीम इंडियाला अधिक धावा गरजेच्या होत्या. विराट कोहली कशा पद्धतीने गोलंदाजांवर आक्रमण करतो हे देखील मॅचमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळालं असं देखील अॅरोन फिंचने मुलाखतीमधील एका प्रश्नाचं उत्तर देताना स्पष्ट केलं.