T20 WC: IND-BAN हा सामना पाण्यात वाहून गेला, तर सेमीफायनलला टीम इंडिया आऊट होणार? असं आहे सोपं समीकरण

रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या काळात टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे.

T20 WC: IND-BAN हा सामना पाण्यात वाहून गेला, तर सेमीफायनलला टीम इंडिया आऊट होणार? असं आहे सोपं समीकरण
IND-BAN matchImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 11:18 AM

मेलबर्न : ऑस्ट्रेलियात (Australia) सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) टीम इंडियाने (Team India) चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत टीम इंडियाच्या तीन मॅचेस झाल्या आहेत. त्यापैकी टीम इंडियाने दोन मॅच जिंकल्या आहेत. आज टीम इंडियाची बांगलादेशविरुद्ध मॅच होणार आहे. पण आजच्या मॅचवरती पावसाचं सावट असल्यामुळे टीम इंडियाचं सेमीफायनलमध्ये जाण्याचं गणित बिघडण्याची शक्यता आहे.

रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या काळात टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. आजची मॅच ऑस्ट्रेलियातील एडिलेडच्या ओव्हल मैदानात होणार आहे. तिथं ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याकडून आज पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

आजच्या मॅचमध्ये बांगलादेश टीमचा पराभव करणे टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. टीम इंडियाचे तीन सामन्यात 4 गुण आहेत. शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेशचे गुणे देखील टीम इंडिया एव्हढेचं आहेत. गुणतालिकेमध्ये आफ्रिका, इंडिया, बांगलादेश, झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि नेदरलँड अशी क्रमवारी आहे.

हे सुद्धा वाचा

समजा, आजच्या मॅचमध्ये टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव केला, तर टीम इंडियाकडे 6 गुण होतील. त्याचबरोबर टीम इंडिया एक नंबरला जाईल. त्यानंतर टीम इंडियाला झिम्बाब्वेबरोबरची मॅच जिंकावी लागेल. सध्या आफ्रिका टॉपमध्ये आहे. आफ्रिका टीमने पाकिस्तान टीमचा पराभव केला, तर आफ्रिका टीमला सात गुण मिळतील. टीम इंडियाच्या उरलेल्या दोन्ही मॅच जिंकल्या तर टीम इंडियाकडे आठ गुण असतील. परंतु उरलेल्या सगळ्या मॅच आफ्रिका टीमने जिंकल्या तर त्याचे गुण 9 असतील.

आजच्या सामन्यात समजा पाऊस आला, टीम इंडिया आणि बांगलादेश टीमला 1-1 गुण मिळेल. त्यानंतर बांगलादेश टीमने समजा पाकिस्तान टीमला मोठ्या फरकाने हरवले तर टीम इंडियाला उत्यांत्य फेरीत पोहोचण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.