T20 World Cup 2022: आज ऑस्ट्रेलियाची मॅच आर्यलॅंडशी, सेमीफायनलचा मार्ग आज खुला होणार
विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि आर्यलॅंड या दोन्ही टीमकडे सद्या समान गुण आहेत.
ब्रिस्बेन : आज ऑस्ट्रेलिया (Australia) आणि आर्यलॅंड (Ireland) यांच्यात मॅच होणार आहे. ही मॅच ब्रिस्बेनच्या (Brisbane) मैदानावर होणार आहे. आजची मॅच भारतीय वेळेनुसार दीड वाजता सुरु होईल. आजच्या मॅचमध्ये ज्या टीमचा विजय होईल, त्याचा सेमीफायलनमध्ये पोहोचण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे आजच्या मॅचमध्ये दोन्ही टीममधील संघर्ष पाहायला मिळेल एवढं मात्र नक्की.
विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि आर्यलॅंड या दोन्ही टीमकडे सद्या समान गुण आहेत. पण आर्यलॅंड टीम रणरेटच्या हिशोबाने पुढे आहे. आजच्या मॅचमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
आतापर्यंत आर्यलॅंड टीमची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यांनी यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत मोठ्या टीमचा पराभव केला आहे.
ऑस्ट्रेलिया टीम
अॅरॉन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोस हेझलवूड.
आर्यलॅंड टीम
पॉल स्टर्लिंग, अँडी बालबर्नी (क), लॉर्कन टकर, हॅरी टेक्टर, कर्टिस केम्पफर, जॉर्ज डॉकरेल, गेराथ डिलेन, मार्क एडर, फिएन हँड, बॅरी मॅककार्थी, जोश लिटल.