T20 World Cup 2022 : विश्वचषकाबाबतची रवी शास्त्री यांची भविष्यवाणी खरी ठरणार का ?
टीम इंडियाच्या प्रत्येक माजी खेळाडूकडून वेगळी भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे.
आत्तापर्यंत जगभरातल्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी विश्वचषकाबाबत (T20 World Cup 2022) भविष्यवाणी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सेमीफायनलपर्यंत या टीम पोहचू शकतात असा विश्वास सुद्धा व्यक्त केला. त्यामुळे कुणाची भविष्यवाणी खरी ठरते याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. तसेच चाहत्यांनी सुध्दा सोशल मीडिया (Social Media) आपआपले अंदाज व्यक्त केले आहेत. भारत आणि पाकिस्तान (IND VS PAK) यांच्या रविवारी मेलबर्नमध्ये मॅच होणार आहे.
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आत्तापर्यंत अनेकदा भविष्यवाणी केली आहे. तसेच आशिया चषकानंतर निवड समितीवर सुद्धा टीका केली आहे. रवी शास्त्री यांनी टीम इंडिया, पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या टीम सेमीफायनलमध्ये पोहोचतील अशी भविष्यवाणी केली आहे.
ऑस्ट्रेलियातील खेळपट्टी ही फक्त तेज गोलंदाजांना उपयुक्त आहे, त्यामुळे तिथं खेळण्यासाठी टीम इंडिया, पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या टीममधील खेळाडू अधिक चांगला खेळ करु शकतात.
टीम इंडियाच्या प्रत्येक माजी खेळाडूकडून वेगळी भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर मॅच झाल्यानंतर प्रत्येकवेळी आपले खेळाडू आपला अंदाज व्यक्त करीत असतात.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
पाकिस्तान टीम
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , फखर जमान.