T20 World Cup: टीम इंडियाचा हा खेळाडू घामाच्या वासाने जॅकेट ओळखतो, मुलाखती दरम्यानचं टॅलेट कॅमेऱ्यात कैद
त्यावेळी टीम इंडियाचा खेळाडू घामाने टी शर्ट ओळखत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मेलबर्न: विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2022) सेमीफायनलपर्यंत (Semifinale) पोहोचली आहे. टीम इंडियाने (Team India) आतापर्यंत चांगली खेळी केली आहे, त्यामुळे टीम इंडिया यंदाचा विश्वचषक जिंकेल अशी भविष्यवाणी केली आहे. कारण टीम इंडियाने पाचपैकी चार मॅच जिंकल्या आहे. टीम इंडिया, पाकिस्तान, न्यूझिलंड, इंग्लंड या टीम सेमीफानलमध्ये पोहोचल्या आहेत. झिम्बाब्वेविरुद्ध टॉस झाल्यानंतर रोहित शर्मा मुलाखत देत आहे. त्यावेळी टीम इंडियाचा खेळाडू घामाने टी शर्ट ओळखत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Ashwin Anna Supremacy
हे सुद्धा वाचाThis is the right way to find your clothes pic.twitter.com/a9YSakerU4
— chintubaba (@chintamani0d) November 7, 2022
टीम इंडियाचा खेळाडू आर. आश्विन त्याच्या स्मार्टपणामुळे अधिक चर्चेत असतो. विशेष म्हणजे त्याचा स्मार्ट खेळाडूमध्ये समावेश व्हावा अशी देखील सोशल मीडियावर चाहत्यांनी चर्चा असते. आतापर्यंत अनेकदा क्रिकेट खेळताना त्याने स्मार्टपणा दाखवला आहे.
आश्विन त्याचं जॅकेट घामाचा वास घेऊन ओळखत असल्याचं दिसत आहे. रोहित शर्मा मुलाखत देण्यात गुंग आहे. विशेष म्हणजे आश्विनला समोर रोहित शर्माची मुलाखत सुरु असल्याची साधी कल्पना सुध्दा नाही. तो त्याचं जॅकेट घामाच्या वासाने ओळखत असल्याचं दिसतं आहे.