T20 World Cup 2024: वर्ल्ड चँपियन बनताच टीम इंडिया मालामाल, पैशांचा पाऊस ! कोणत्या टीमला किती रक्कम मिळाली ?

T20 वर्ल्ड कप 2024 चा अंतिम सामना जिंकून टीम इंडियाने 11 वर्षांचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आहे. भारतीय संघाने 17 वर्षांनंतर टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे. महेंद्रसिंग धोनीनंतर हा ट्रॉफी जिंकणारा रोहित शर्मा हा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. या विजयानंतर टीम इंडियावर पैशांचा पाऊस पडला आहे.

T20 World Cup 2024: वर्ल्ड चँपियन बनताच टीम इंडिया मालामाल, पैशांचा पाऊस ! कोणत्या टीमला किती रक्कम मिळाली ?
team indiaImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 30, 2024 | 8:40 AM

टीम इंडियाने 2024 च्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेत चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही आणि अंतिम फेरीतही हाच ट्रेंड कायम ठेवला आणि दक्षिण आफ्रिकेला हरवून 17 वर्षांची प्रतीक्षा संपवली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ग्रुप स्टेज आणि सुपर-8 मध्ये प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाचा पराभव केला. यानंतर सेमीफायनमलमध्ये भारताने इंग्लंडसारख्या बलाढ्य संघालाही लोटांगण घालायला लावलं. त्यांनी ही विजयी घोडदौड फायनलमध्येही कायम ठेवली. सर्वात मोठ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून 11 वर्षांनंतर भारतीय संघानै आयसीसी ट्रॉफी जिंकली आणि भरपूर कमाईही केली. आयसीसीने 11.25 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 93.80 कोटी रुपये बक्षीसाची रक्कम म्हणून ठेवली होती, जी सर्व संघांमध्ये वाटण्यात आली.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेला किती पैसे मिळाले ?

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला हरवून 17 वर्षांनंतर T20 वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली. या यशासाठी भारतीय संघाला ICC कडून 2.45 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 20.42 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. याशिवाय, भारतीय संघाला प्रत्येक विजयासाठी स्वतंत्रपणे $31,154 (अंदाजे 26 लाख रुपये) मिळाले आहेत. ही सर्व रक्कम एकत्र केली तर भारतीय संघाने या स्पर्धेतून 22.76 कोटी रुपये कमावले आहेत.

तर प्रथमच वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या आणि या स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 1.28 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 10.67 कोटी रुपये) मिळाले आहेत, जे चॅम्पियन संघाच्या बक्षीस रकमेच्या निम्मे आहे. याशिवाय 8 सामने जिंकण्यासाठी त्यांना सुमारे 2.07 कोटी रुपये वेगळे मिळाले. दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेतून एकूण 12.7 कोटी रुपयांची कमाई केली.

सेमीफायनलमध्ये पराभूत संघांना किती रक्कम मिळाली ?

आयसीसीने सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या संघांसाठी 7,87,500 डॉलर्स (6.56 कोटी) इतकी बक्षीसाची रक्कम ठेवली होती. अफगाणिस्तान आणि इंग्लंडचे संघ उपांत्य फेरीत पराभूत झाले होते. त्यामुळे त्यांना 6.56 कोटींव्यतिरिक्त प्रत्येक विजयासाठी वेगळे 26 लाख रुपयेही देण्यात आले आहेत.

सुपर-8 वाल्या टीम्सही मालामाल

या स्पर्धेत 4 संघ सुपर-8 मधून बाहेर पडले, परंतु त्यांनीही बक्कळ कमाई केली. प्रत्येक संघाला 3,82,500 डॉलर्स (सुमारे 3.18 कोटी रुपये) देण्यात आले आहेत. वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि अमेरिका या फेरीतून बाहेर पडले, ज्यांना प्रत्येक विजयासाठी स्वतंत्रपणे 3.18 कोटी आणि 26 लाख रुपये मिळाले.

ग्रुप स्टेजमधील संघही रिकाम्या हाती परतले नाहीत

आयसीसीने ग्रुप स्टेजमधून बाहेर पडलेल्या संघालाही रिकाम्या हाती परत जाऊ दिले नाही. ICC ने 9व्या ते 12व्या क्रमांकावर असलेल्या संघांना प्रत्येक विजयासाठी 2,47,500 डॉलर्स (सुमारे 2.06 कोटी) सोबत 26 लाख रुपये दिले. तर 13व्या ते 20व्या क्रमांकावर असलेल्या संघांना 2,25,000 डॉलर (सुमारे 1.87 कोटी रुपये) सोबत 26 लाख रुपये देण्यात आले आहेत.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.