T20 World Cup | टी-20 वर्ल्डकप लांबणीवर, IPL ची वाट मोकळी!
कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर आयसीसीने ऑस्ट्रेलियामध्ये प्रस्तावित पुरुष टी-20 विश्वचषक 2020 स्थगित केला आहे
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा टी-20 वर्ल्डकप स्थगित करण्यात (T20 World Cup Postponed) आला आहे. अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) बोर्डाने सोमवारी (20 जुलै) टेलिकॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. याशिवाय, इंडियन प्रिमिअर लीगच्या (IPL) आयोजनाचा मार्गही खुला झाला आहे (T20 World Cup Postponed).
“कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर आयसीसीने ऑस्ट्रेलियामध्ये प्रस्तावित पुरुष टी-20 विश्वचषक 2020 स्थगित केला आहे”, असं आयसीसीने सांगितलं. टी-20 विश्वचषकाचं आयोजन 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत आयोजित करण्यात येणार होता.
“सध्याची परिस्थिती पाहता ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेचं यजमानपद स्वीकारणे जवळपास अशक्य आहे. 16 आंतराष्ट्रीय संघांसाठी व्यवस्था करणे शक्य नाही”, असं ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने मे महिन्यातच आयसीसीला सांगितलं होतं.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“आमचा देश टी-20 विश्वचषकातील संघांसाठी व्यवस्था करेल. मात्र, मुख्य मुद्दा हा आहे की प्रेक्षकांशिवाय रिकाम्या मैदानात स्पर्धेचं आयोजन करणे योग्य असेल का?”, असं ऑस्ट्रेलियाचे क्रीडा मंत्री रिचर्ड केलबेक यांनी म्हटलं होतं.
“कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात यावर्षी प्रेक्षकांसोबत टी-20 विश्वचषकाचं आयोजन करणे कठिण होतं. प्रेक्षकांविना विश्वचषक सारख्या स्पर्धांचं आयोजन करण्याचा काहीही अर्थ नाही, त्यामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे”, असं ऑस्ट्रेलियाने सांगितलं (T20 World Cup Postponed).
ICC MEN’S T20 WORLD CUP 2020 POSTPONED – For more details, please refer here: https://t.co/bqjPHt0pP6
— ICC Media (@ICCMediaComms) July 20, 2020
आजच्या बैठकीत आयसीसी बोर्डाने 2023 मधील भारतातील प्रस्तावित एकदिवसीय विश्वचषक मार्च-एप्रिलऐवजी नोव्हेंबरमध्ये खेळवण्याचा नर्णय घेतला. तोपर्यंत क्वॉलिफाईंग प्रक्रियेसाठीही वेळ मिळू शकेल, असं आयसीसीने सांगितलं.
आयसीसी पुरुष विश्वचषक वेळापत्रक
- आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2021 ऑक्टोबर-नोव्हेंबर 2021 ला आयोजित केला जाईल आणि 14 नोव्हेंबर 2021 ला शेवटचा सामना असेल.
- आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2022 ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 ला आयोजित केला जाईल आणि 13 नोव्हेंबर 2022 ला शेवटचा सामना असेल.
- आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2023 ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 ला आयोजित केला जाईल आणि 26 नोव्हेंबर 2023 ला शेवटचा सामना असेल.
IPL कधी होण्याची शक्यता?
टी-20 विश्वचषक 2020 स्थगित झाल्याने आता आयपीएलचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआयने सीजन-13 चं आयोजन 26 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. बीसीसीआय आयपीएल सीजन-13 चं आयोजन यूएईमध्ये करण्याची शक्यता आहे.
IPL 2020 | ‘आयपीएल 2020’ भारताबाहेर नेण्याच्या हालचाली, तारखा जवळपास निश्चित https://t.co/GuW5CCFTe6 #IPL2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 20, 2020
T20 World Cup Postponed
संबंधित बातम्या :
Asia Cup 2020 | आशिया चषकाचं आयोजन रद्द, गांगुलींची घोषणा, IPL बाबतही महत्त्वाची माहिती
Kainat Imtiaz | विराटवर फिदा पाकिस्तानच्या सौंदर्यवती क्रिकेटपटूचा साखरपुडा