तौक्ते चक्रीवादळचा तडाखा, वानखेडे स्टेडियमची अशी झाली अवस्था, फोटो व्हायरल

मुंबईतल्या समुद्र किनाऱ्याशेजारीच असणाऱ्या वानखेडे स्टेडियमला देखील तौक्ते वादळाचा फटका बसला. या वादळात स्टेडियमधील एक स्टँड कोसळलेलं पाहायला मिळालं तर एका साईट स्क्रीनचंही नुकसान झालं. (Tauktae Cyclone Wankhede Stadium Sight Screen Collapse)

तौक्ते चक्रीवादळचा तडाखा, वानखेडे स्टेडियमची अशी झाली अवस्था, फोटो व्हायरल
तौक्ते चक्रीवादळचा वानखेडेला फटका...
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 10:15 AM

मुंबई : महाराष्ट्रामध्ये तौक्ते चक्रीवादळाने मोठा कहर केलाय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मुंबईमध्ये तर या वादळाचं रौद्र रुप पाहायला मिळालं. मुंबईतल्या समुद्र किनाऱ्याशेजारीच असणाऱ्या वानखेडे स्टेडियमला देखील वादळाचा फटका बसला. या वादळात स्टेडियमधील एक स्टँड कोसळलेलं पाहायला मिळालं तर एका साईट स्क्रीनचंही नुकसान झालं. (Tauktae Cyclone Wankhede Stadium Sight Screen Collapse)

वानखेडे स्टेडियमला वादळाचा तडाखा

सोमवारी दिवसभर मुंबईत वादळी वारा सुरु होता. वाऱ्याचा आणि पावसाचा वेग असल्याने समुद्र किनाऱ्याशेजारील वानखेडे स्टेडियमला तौक्तेचा दणका बसला. स्टेडियमधील एका स्टँडचं वादळामुळे नुकसान झालं. स्टँड थेट जमिनीवर कोसळलं. तर बॅट्समनच्या एकाग्रतेसाठी महत्त्वाची असणारी साईट स्क्रिनही जमीनदोस्त झाली.

स्टेडियमधील स्टँड कोसळलं, साईट स्क्रिन जमीनदोस्त, फोटो व्हायरल

वानखेडे स्टेडियममध्ये चक्रीवादळ केलेल्या कहराने झालेल्या नुकसानीचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. असाच एक फोटो ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. या फोटोतील वानखेडे स्टेडियमची अवस्था पाहून क्रिकेट फॅन्स नाराज झाले आहेत. आपल्या कमेंटमधून ते त्यांचं दु:ख व्यक्त करतायत.

मुंबईत आजही पावसाचं धुमशान?

तौक्ते चक्रीवादळ निघून गेल्यानंतरही मुंबईत मंगळवारी पावसाची शक्यता आहे. पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरांसह आजुबाजूच्या परिसरातील आकाशात काळे ढग दाटून आले आहेत. अधूनमधून पावसाच्या (Mumbai Rains) तुरळक सरीही बरसत आहेत. याशिवाय, वारेही (Wind) नेहमीपेक्षा वेगाने वाहत आहेत. वातावरणाचा एकूणच नूर पाहता मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबईत पुढील 24 तासांत अतिवृष्टीची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

मुंबईत मंगळवारी दिवसभरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. तसेच मुंबईत येत्या काही तासांत ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस होणार असल्याने सतर्कतेचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईवरील धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही.

Tauktae Cyclone Wankhede Stadium Sight Screen Collapse

हे ही वाचा :

धोनीकडून जाडेजाची नक्कल, आता ‘सर जाडेजा’चा भन्नाट रिप्लाय

ENG vs NZ : इंग्लंडला मोठा झटका, या कारणामुळे जोफ्रा आर्चर कसोटी संघाबाहेर!

आधी म्हणाली विराट माझा फेव्हरेट, आता सांगितलं दुसरंच नाव, रश्मिका मंदानाने कोहलीसह RCB च्या चाहत्यांचं हृदय तोडलं!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.