Ind vs Aus | सिडनीची पसंती कांगारुंना, मात्र 42 वर्षांचा इतिहास बदलण्यास टीम इंडिया सज्ज

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 7 जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड (SCG)येथे खेळण्यात येणार आहे.

Ind vs Aus | सिडनीची पसंती कांगारुंना, मात्र 42 वर्षांचा इतिहास बदलण्यास टीम इंडिया सज्ज
ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे.
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 4:23 PM

सिडनी : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या कसोटीत विजय मिळवला. या विजयासह भारताने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. या मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड (Sydney Cricket Ground) येथे खेळण्यात येणार आहे. दोन्ही संघ मालिकेत बरोबरीत आहेत. यामुळे आगामी तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याचा मानस दोन्ही संघांचा असणार आहे. या निमित्ताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया या दोन्ही संघांचा सिडनीवरील रेकॉर्ड कसा आहे, हे आपण पाहणार आहोत. (Team India beat Australia 42 years ago in 1978 at the Sydney Cricket Ground)

हेड टु हेड

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियामध्ये सिडनीत एकूण 12 कसोटी सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाला 12 पैकी 1 सामना जिंकता आला आहे. तर ऑस्ट्रेलियाने 5 सामने जिंकले आहेत. तर 6 सामने अनिर्णित राहिले आहेत.

टीम इंडियाने सिडनीवरील एकमेव सामना हा 42 वर्षांपूर्वी जिंकला होता. हा सामना 12 जानेवारी 1978 रोजी खेळला गेला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत टीम इंडियाला सिडनीवर विजय मिळवता आलेला नाही. या सामन्यात कांगारुंचा पहिला डाव 131वर आटोपला. चंद्रशेखरने 4 तर बिशन सिंह बेदी यांनी 3 विकेट्स घेतल्या. प्रत्युतरादाखल टीम इंडियाने 396-8 धावसंख्या असताना डाव घोषित केला. गुंडप्पा विश्वनाथने 79, करसन घावरीने 64 धावा केल्या. तसेच सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, चेतन चौहान, आणि सय्यद किरमानी या चौकडीने अनुक्रमे 49, 48, 42 आणि 42 धावांची खेळी केली.

डाव आणि 2 धावांनी विजय

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 263 धावांवर आटोपला. यामुळे टीम इंडियाचा डाव आणि 2 धावांनी शानदार विजय झाला. टीम इंडियाकडून दुसऱ्या डावात इरापल्ली प्रसन्नाने 4 विकेट्स घेतल्या. सिडनीवरील टीम इंडियाचा हा तिसरा सामान होता. या आधीच्या 2 सामन्यांपैकी एका सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. तर एक सामना हा अनिर्णित राहिला होता.

सिडनीतील अखेरचा सामनाही अनिर्णित

1978 च्या विजयानंतर टीम इंडियाला या मैदानात कसोटी सामना जिंकता आलेला नाही. यानंतर टीम इंडियाला 4 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. तर 5 सामने हे अनिर्णित राहिले. या मैदानात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियात खेळण्यात आलेला अखेरचा सामनाही अनिर्णित राहिला होता. त्यामुळे टीम इंडिया 42 वर्षानंतर सिडनीत विजय मिळवून इतिहास रचणार का, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

संबंधित बातम्या :

AUS vs Ind, 3rd Test | स्टार्कचा बंदोबस्त कसा करायचं? तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा मेगाप्लॅन

यंदा सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज, राहुल दुसऱ्या स्थानी, रनमशीन विराट फ्लॉप

(Team India beat Australia 42 years ago in 1978 at the Sydney Cricket Ground)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.