AUS v IND, 2nd Test | कर्णधार अजिंक्य रहाणेचे डॅशिंग निर्णय, बॉक्सिंग डे कसोटीत दमदार नेतृत्त्व
टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत नेतृत्वाची जबाबदारी अजिंक्य रहाणेला देण्यात आली आहे.
मेलबर्न : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs India 2nd Test) यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) दुसरा कसोटी सामना खेळण्यात येतोय. हा बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Tets) सामना आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतला आहे. त्यामुळे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे (Ajinkya Rahane) या कसोटी मालिकेत नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. रहाणेने या दुसऱ्या कसोटीत आपल्या नेतृत्वाची चूणुक दाखवून दिली. तसेच रहाणेने योग्य वेळी योग्य निर्णय घेतले. रहाणेने आपल्याकडे असलेल्या गोलंदाजांचा योग्य आणि गरजेनुसार वापर केला. त्यामुळे पहिल्याच दिवशी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट करण्यास यश आले. (team india captain ajinkya rahane take perfect decision in boxing day test against australia)
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात गोलंदाज मोहम्मद सिराजने पदार्पण केलं. रहाणे सिराजला गोलंदाजीची संधी देईल, अशी आशा होती. मात्र रहाणेने सिराजचा पहिल्या सत्रात उपयोग केला नाही. अजिंक्यने पहिल्या सत्रात जसप्रीत बुमराह, उमेश यादव, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजाकडून गोलंदाजी करुन घेतली. पहिल्या सत्रात खेळपट्टीकडून फिरकीपटूंना मदत मिळत होती. यामुळे रहाणेने जाडेजा आणि अश्विनला अधिक ओव्हर टाकायला दिल्या.
रहाणेचा हा निर्णय योग्य ठरला. पहिल्या सत्रात टीम इंडियाला एकूण 3 विकेट्स मिळाल्या. यामध्ये जो बर्न्स, मॅथ्यू वेड आणि स्टीव्ह स्मिथचा समावेश होता. या 3 पैकी 2 विकेट्स फिरकीने घेतल्या. या पहिल्या सत्रानंतर रहाणेने मोहम्मद सिराजला बोलिंगची संधी दिली. सिराजने रहाणेचा विश्वास सार्थ ठरवला. पदार्पणातील सामन्यात 2 विकेट्स मिळवल्या.
अजिंक्यची नेतृत्वातील कामगिरी
अजिंक्यला कसोटीमध्ये नेतृत्वाचा फारसा अनुभव नाहीये. अजिंक्यने याआधी टीम इंडियाचे 2 कसोटी सामन्यात नेतृत्व केलं आहे. या दोन्ही सामन्यात रहाणेने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. यामुळे या तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियाला विजय मिळवून देईल, अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे.
संबंधित बातम्या :
AUS vs IND, 2nd Test | अश्विनच्या फिरकीवर फसला, स्टीव्ह स्मिथच्या नावे नकोसा विक्रम
AUS vs IND, 2nd Test | शुभमन गिल-मोहम्मद सिराजचे ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी पदार्पण
(team india captain ajinkya rahane take perfect decision in boxing day test against australia)