किंग कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा, विराट ठरला दशकातील सर्वोत्कृष्ट फलंदाज, कपिल देव आणि सचिनचाही सन्मान
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) 2010 या दशकातील सर्वश्रेष्ठ (odi player of the decade) एकदिवसीय खेळाडू ठरला आहे. ‘विस्डेन’ने (Wisdens) विराटची पुरस्कारासाठी निवड केली आहे
मुंबई : टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विराट 2010 च्या दशकातील सर्वश्रेष्ठ एकदिवसीय क्रिकेटर ठरला आहे. विस्डेन’ने (Wisden Almanack) पुरस्कारासाठी विराटची निवड केली आहे. तर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) हा सलग दुसऱ्यावर्षी वर्षातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू ठरला आहे. (team india captain virat kohli became 3rd indian wisden odi player of decade 2010 after kapil dev and sachin tendulkar)
पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या 50 व्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक दशकातील 5 फलंदाजांची निवड करण्यात आली आहे. 1971 ते 2021 या कालावधीतील खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार विराट कोहलीची 2010 मधील दशकासाठी निवड करण्यात आली आहे. विराटने ऑगस्ट 2008 मध्ये श्रीलंके विरुद्ध एकदिवसीय पदार्पण केलं होतं. विराटने तेव्हापासून आतापर्यंत एकूण 254 वनडे सामन्यांमध्ये 12 हजार 169 धावा केल्या आहेत. तसेच विराट हा 2011 च्या वर्ल्ड कप विजेता संघाचा सदस्यही होता.
कपिल देव आणि सचिन तेंडुलकरचाही सन्मान
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि कपिल देव (Kapil Dev) यांचाही सन्मान करण्यात आला आहे. सचिनची 90 च्या दशकातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटर म्हणून निवड करण्यात आली आहे. सचिनने 1998 मध्ये एका वर्षात तब्बल 9 वनडे शतकं झळकावली होती. तर टीम इंडियाला पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकूवन देणारे कपिल देव हे 1980 च्या दशकातील महान क्रिकेटपटू ठरले आहेत. तसेच कपिल देव यांनी 1983 मध्ये सर्वाधिक विकेट्स आणि सर्वात जास्त स्ट्राईक रेटने 1000 हजार धावा करण्याची कामगिरी केली होती.
संबंधित बातम्या :
RR vs DC IPL 2021 Match Prediction | दोन विकेटकीपर कर्णधारांमध्ये कडवी झुंज, राजस्थान विरुद्ध दिल्ली आमनेसामने, कोण जिंकणार सामना?
VIDEO | विकेट गेल्यावर बॅटने खुर्ची उडवली, विराट कोहलीवर नियमभंगाचा ठपका
Video | कॅप्टन कोहलीचा कानमंत्र, शाहबाज अहमदच्या एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट्स, अन् सामना बंगळुरुच्या बाजूने झुकला
(team india captain virat kohli became 3rd indian wisden odi player of decade 2010 after kapil dev and sachin tendulkar)