टीम इंडिया पुनरागमन, पण प्लेईंग 11 मध्ये स्थान नाही ! पृथ्वी शॉने स्पष्टच सांगितलं काय झालं?

पृथ्वी शॉ ची टीम इंडियामध्ये नुकतीच निवड झाली होती. पण त्यालाा प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नव्हतं. त्यावर आता पृथ्वी शॉनं आपलं मत मांडलं आहे.

टीम इंडिया पुनरागमन, पण प्लेईंग 11 मध्ये स्थान नाही ! पृथ्वी शॉने स्पष्टच सांगितलं काय झालं?
प्लेईंग 11 मध्ये संधी न मिळाल्याने पृथ्वी स्पष्टच म्हणाला, "माझ्या आधी..."
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 7:13 PM

मुंबई : पृथ्वी शॉ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं नाव आहे. मग तो वाद असो की, टीम इंडियातील त्याची निवड. न्यूझीलँडविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी पृथ्वी शॉची संघात निवड करण्यात आली होती. पण असं असलं तरी त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये काही स्थान मिळालं नाही. कारण संघात त्याच्याऐवजी शुभमन गिलला स्थान देण्यात आलं. पहिल्या दोन सामन्यात फेल गेल्यानंतर गिलनं तिसऱ्या सामन्यात शतक ठोकलं आणि आपली दावेदारी आणखी मजबूत केली. पृथ्वी शॉने शेवटचा सामना जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. संघात पुन्हा निवड होऊनही प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाल्याबद्दल खुद्द पृथ्वी शॉनं मौन सोडलं आहे.

“मला टी 20 संघात पुन्हा स्थान मिळाल्याबद्दल आणि सराव करण्याची संधी मिळाल्याने आनंद वाटला. हा पण मला संधी मिळाली नाही. असं असलं तरी संघात पुनरागमन करण्याची संधी दिली हे माझ्यासाठी खूप काही आहे. आता सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे की, संघात कधी खेळायचं कधी नाही. मी त्यांच्या निर्णयाचा आदर करतो.”, असं पृथ्वी शॉ याने सांगितलं.

“त्यांनी माझ्याऐवजी अशा व्यक्तीला संधी दिली जी व्यक्ती खरंच चांगली खेळत आहे. अशाच मला कोणत्याच पश्चाताप होत नाही. मी संधी शोधतच राहाणार आणि लक्ष्य गाठण्यासाठी मी सज्ज आहे. भारतीय संघासोबत मी ते लक्ष्य गाठेल.”, असं पृथ्वी शॉ याने पुढे सांगितलं.

“मी चांगल्या धावा करत आहे पण मला वाटतं इतकं पुरेसं नाही.मला अजून चांगल्या धावा करणं गरजेचं आहे. मग मी 379 धावा केल्या. तो माझा दिवस होता आणि ही संधी मी जाऊ दिली नाही. कधी वाईट वाटतं की, प्रयत्न करूनही संघात का नाही? पण कधीही तितका उशीर होत नाही.”, असं सांगत पृथ्वी शॉने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

पृथ्वी शॉने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत गेल्या काही दिवसात चांगली कामगिरी केली आहे. रणजी ट्रॉफीतील एका सामन्यात 379 धावांची खेळी केली. 383 चेंडू खेळतातना त्याने 49 चौकार आणि 4 षटकार ठोकले. त्यानंतर सैय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत 363 धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलँडविरुद्धच्या सामन्यात संघात पुनरागमन झालं.

भारत विरुद्ध न्यूझीलँड मालिका संपल्यानंतर पृथ्वी शॉ नुकताच एका वादात अडकला होता. अभिनेत्री सपना गिल आणि त्यांच्या मित्रांसोबत वाद झाला होता. रस्त्यावर मारहाणीच्या घटनेनंतर पृथ्वी शॉ चर्चेत आला होता. त्यानंतर सपना आणि तिच्या मित्रांना अटक करण्यात आली होती.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.