मुंबई : टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती (sudip tyagi announces retirement) घेतली आहे. सुदीप त्यागी असं या वेगवान गोलंदाजाचं नाव आहे. वयाच्या 33 वर्षी त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सुदीपने निवृत्तीबाबतची माहिती ट्विट करत दिली आहे. सुदीपला आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्याची फारशी संधी मिळाली नाही. सुदीप टीम इंडियाकडून केवळ 4 एकदिवसीय तर अवघी 1 टी 20 मॅच खेळला होता. सुदीप आयपीएलमध्येही दोन संघांसाठी खेळला होता. Team India fast bowler Sudip Tyagi announces retirement from all forms of cricket
This is the most difficult decision i ever made , to say goodbye to my dream . #sudeeptyagi #teamindia #indiancricket #indiancricketer #bcci #dreamteam #ipl pic.twitter.com/tN3EzQy9lM
— Sudeep Tyagi (@sudeeptyagi005) November 17, 2020
सुदीपने 12 डिसेंबर 2009 मध्ये मोहालीत श्रीलंकेविरुद्ध टी 20 मध्ये पदार्पण केलं होतं. तसेच सुदीपला यानंतर अवघ्या काहीच दिवसांनी एकदिवसीय सामन्यातही पदार्पणाची संधी देण्यात आली. सुदीपने श्रीलंकेविरुद्धच एकदिवसीय पदार्पण केलं होतं. सुदीपने 27 डिसेंबर 2009 मध्ये एकदिवसीय सामन्यात डेब्यु केलं होतं. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम (तेव्हाचं फिरोजशाह कोटला मैदान) खेळण्यात आला होता. सुदीपने एकूण 4 एकदिवसीय सामन्यात 3 विकेट्स घेतल्या होत्या. तर त्याला टी 20 मध्ये विकेट घेण्यास यश आले नाही.
सुदीपने एकूण 41 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 109 विकेट्स घेतल्या आहेत. तर 23 लिस्ट ए सामन्यात 31 बळी मिळवल्या आहेत. तसेच 23 टी 20 सामन्यात 16 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.
सुदीपने आयपीएलमध्येही 14 सामने खेळले आहेत. त्याने 2009 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं. त्याने आयपीएलमध्ये चेन्नई आणि हैदराबादचे प्रतिनिधित्व केलं आहे.
सुदीपने आपल्या निवृत्तीच्या ट्विटसह एक पत्रक शेअर केलं आहे. यामध्ये त्याने सर्वांचे आभार मानले आहे. सुदीपला महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात पदार्पणाची संधी मिळाली होती. त्यामुळे सुदीपने धोनीचे आभार मानले आहेत. तसेच मोहम्मद कैफ, रुदप्रताप सिंह (आरपी सिंह), सुरेश रैना हे सुदीपचे आदर्श होते. सुदीपने यांचेही आभार मानले आहे. तसेच सुदीपने आपल्या प्रशिक्षकांचं, आपल्या सहकाऱ्याचं, संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयचेही आभार मानले आहेत.
दरम्यान सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनीमध्ये आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना 27 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे.
संबंधित बातम्या :
महेंद्रसिंह धोनीची क्रिकेटमधून निवृत्ती, सचिन तेंडुलकर, विराट कोहलीची प्रतिक्रिया
महेंद्रसिंह धोनी धोनीपाठोपाठ रैनाचीही निवृत्तीची घोषणा
Team India fast bowler Sudip Tyagi announces retirement from all forms of cricket