Mohammed Siraj BMW | Platina ते BMW, रिक्षाचालकाचा मुलगा मोहम्मद सिराजची गरुडझेप

टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराजने स्वत:ला बीएमडबल्यू कार भेट दिली आहे. त्याने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

Mohammed Siraj BMW | Platina ते BMW, रिक्षाचालकाचा मुलगा मोहम्मद सिराजची गरुडझेप
टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराजने स्वत:ला बीएमडबल्यू कार भेट दिली आहे.
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 1:11 PM

हैदराबाद : ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचे (Team India) खेळाडू भारतात परतले. यानंतर हे खेळाडू आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने  (Mohammed Siraj) शानदार कामगिरी केली. या विजयाच्या आनंदात मोहम्मद सिराजने स्वत:ला बीएमडबल्यू (Mohammed Siraj Buy Bmw) गाडी भेट केली आहे. सिराजने याबाबतची माहिती इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत दिली आहे. (team india faster bowler mohammed siraj gifted to himself bmw car after australia tour)

सिराजचं गाड्यांवर विशेष प्रेम आहे. काही वर्षांपूर्वी सिराज प्लाटिना (Platina) चालवायचा. तेव्हा त्याच्याकडे पंक्चर काढण्यासाठीही पैसे नसायचे. अशा खडतर परिस्थितीवर सिराजने मात केली. त्याचे वडिल मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते. आपल्या मुलाने देशाचं प्रतिनिधित्व करावं, असं त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. सिराजला हवी असलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी पुरवली. सिराजनेही कठोर मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवून वडिलांचे स्वप्न पूर्ण केलं. सिराजने ऑस्ट्रेलियावरील विजयानंतर महागडी BMW खरेदी केली. ते पाहण्यासाठी त्याचे वडिल नाहीत. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सिराजच्या वडिलांचं फु्प्फुसाच्या आजाराने निधन झालं होतं. दुखाचा डोंगर कोसळला असतानाही सिराज टीम इंडियासोबतच राहिला. त्याच्या या निर्णयामुळे सर्वच स्तरातून त्याचं कौतुक करण्यात आलं.

वडिलांना श्रद्धांजली

सिराज ऑस्ट्रेलियाहून हैदराबादमधील विमानतळावर पोहचला. यानंतर तो विमानतळावरुन थेट क्रबरस्तानात पोहचला. सिराजने आपल्या वडिलांच्या कबरीवर फुले वाहून श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्याने नमाज अदा केली. वडिलांना श्रद्धांजली वाहताना सिराज भावूक झाला होता.

कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स

मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या कसोटीतून पदार्पण केलं. मोहम्मद शमीच्या जागेवर त्याला संधी देण्यात आली.  सिराजने या संधीच सोनं केलं. तो ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. सिराजने या 4 सामन्यातील मालिकेतील 3 सामन्यांमध्ये एकूण 13 विकेट्स घेतल्या.

इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेसाठी संधी

ऑस्ट्रेलियाविरोधातील धमाकेदार कामगिरीनंतर सिराजला इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटी मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सिराज या इंग्लंडविरोधातील 2 कसोटींमध्ये कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

संबंधित बातम्या :

Mohammed Siraj | विजयीवीर मोहम्मद सिराज विमानतळावरुन थेट कब्रस्तानात, वडिलांच्या आठवणीने भावूक!

प्लॅटिना बाईक ते आंतराष्ट्रीय क्रिकेट सामना, ऑस्ट्रेलियात वर्णभेदाची टीका, वाचा मोहम्मद सिराजची संघर्षगाथा

(team india faster bowler mohammed siraj gifted to himself bmw car after australia tour)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.