Team India T20 World Cup 2022 : टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना, जाणून घ्या सराव सामन्याचे डिटेल्स
ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेच्याविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना मोठा विश्वास निर्माण झाला आहे.
या महिन्यात सुरु होणाऱ्या T20 World Cup साठी टीम इंडिया (Team India) काल ऑस्ट्रेलियासाठी (Australia) रवाना झाली. आजपासून तिथं खेळाडू सरावाला सुरुवात करतील. काही ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर मॅचेस देखील होणार आहे. या मॅचेस (Match) सराव म्हणून होणार आहेत. काल ऋषभ पंतचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेच्याविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना मोठा विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
टीम इंडिया T20 विश्वचषक स्पर्धेसाठी
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
असे होणार सराव सामने
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया XI: 10 ऑक्टोबर
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलेव्हन: 12 ऑक्टोबर
ऑस्ट्रेलिया विरुद्ध: 17 ऑक्टोबर
न्यूझीलंड विरुद्ध: 19 ऑक्टोबर
T20 विश्वचषक स्पर्धेतील वेळापत्रक
भारत विरुद्ध पाकिस्तान, 23 ऑक्टोबर, दुपारी 1.30 वाजता (मेलबर्न)
भारत विरुद्ध गट अ उपविजेता, 27 ऑक्टोबर, दुपारी 12.30 वाजता (सिडनी)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ३० ऑक्टोबर, दुपारी 4.30 (पर्थ)
भारत विरुद्ध बांगलादेश, 2 नोव्हेंबर, दुपारी 1.30 वाजता (अॅडलेड)
भारत विरुद्ध गट ब विजेता, 6 नोव्हेंबर, दुपारी 1.30 वाजता (मेलबर्न)
T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ: