T20 World Cup : उमेश यादव ऐवजी या खेळाडूला संधी मिळायला हवी होती, परंतु…
मोहम्मद शमीचा पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी राखीव खेळाडूमध्ये समावेश करण्यात आला होता.
पुढील महिन्यात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी (T20 World Cup) खेळाडूंची निवड झाल्यापासून टीम निवड समितीवरती अनेकांनी टीका केली आहे. काही तंदुरुस्त खेळाडू घरी असून त्यांचा समावेश न केल्याने माजी खेळाडूंनी (Player) जोरदार टीका सुद्धा केली होती. आशिया चषकात (Asia Cup) महत्त्वाच्या मॅचवेळी काही खेळाडूंनी अत्यंत खराब कामगिरी केली. तरीही त्या खेळाडूंचा टीममध्ये समावेश केल्याने सोशल मीडियावर जोरदार टीका सुरु होती.
मोहम्मद शमीचा पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी राखीव खेळाडूमध्ये समावेश करण्यात आला होता. पण काल त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या जागी उमेश यादव संधी देण्यात आली आहे. उमेश यादवने यावर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली होती.
टी. नटराजन या आयपीएलमध्ये गोलंदाजाने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. परंतु खेळाडू निवड समितीने त्याचा विचार केला नाही. त्याच्याकडे एकहाती सामना जिंकून देण्याची ताकद आहे.
टी. नटराजनने आयपीएलमध्ये 11 मॅचमध्ये 18 विकेट घेतल्या होत्या. त्याचबरोबर त्याच्या गोलंदाजीला अनेक फलंदाज घाबरतात हे सुद्ध आयपीएलमध्ये पाहायला मिळालं. त्याने हैदराबादकडून खेळताना अनेक मॅच जिंकून दिल्या होत्या. तसेच त्याला मॅन ऑफ द मॅच सुद्धा मिळाल्या आहेत.
T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.