Team India: Smriti Mandhana ला ICC चं खास गिफ्ट, या दिग्गजांनाही संधी
भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाचा तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने तिचा विशेष यादीत समावेश केला आहे.
मुंबईः भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना (Star Batsman Smriti mandhana) तिच्या बेधडक फलंदाजीसाठी खास ओळखली जाते. स्मृती मानधना सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेड क्रिकेट टुर्नामेंट खेळत आहे. ही क्रिकेट स्पर्धा चालू असतानाच स्मृती मानधनाला मोठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) तिचे नाव त्यांच्या विशेष यादीत समाविष्ट केले आहे. उपकर्णधार (vice captain) स्मृती मानधना ही भारतीय महिला संघाची युवा सलामीवीर (Young opener) आता तिला शफाली वर्मालाबरोबरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या “100 Percent Cricket Superstars” यादीत तिचा समावेश केला आहे. शफाली वर्मा, इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन, न्यूझीलंडची अमेलिया केर, वेस्ट इंडिजची हेली मॅथ्यूज आणि दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड या 100 टक्के क्रिकेट सुपरस्टारच्या महिला खेळाडूंचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
शुक्रवारी, ICC ने “100 Percent Cricket Superstars” उपक्रमात आणखी पाच खेळाडूंचा समावेश केला – मानधना, फातिमा सना (पाकिस्तान), ऍशले गार्डनर (ऑस्ट्रेलिया), सोफिया डंकले (इंग्लंड) आणि गॅबी लुईस (आयर). 26 वर्षीय मानधना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक दशक पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. तिच्या कारकीर्दीत तिने स्वतःला जगभरातील सर्वच फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्यांपैकी एक उत्तम खेळाडू म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.
क्रिकेटर ऑफ द इयर
भारतीय महिला क्रिकेटमध्येही मानधना कर्णधार म्हणून उदयास आली खरी पण तिच्या सातत्यामुळे तिला 2021 ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून तिला नाव देण्यात आले आहे, तर ICC महिला खेळाडूंच्या क्रमवारीत ती ODI आणि T20I मध्ये फलंदाजांसाठी अनुक्रमे 10 व्या आणि 4 व्या स्थानावर आहे.
मानधनाचा खेळ
मानधनाने 74 एकदिवसीय सामने खेळले असून 42.52 च्या सरासरीने 2,892 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये पाच शतके आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 92 सामन्यांमध्ये 2,192 धावा केल्या असून ज्यामध्ये 16 अर्धशतकांचा समावेश करण्यात आला आहे. मानधनानेही चार कसोटी सामने खेळले असून एक शतक आणि दोन अर्धशतके केली आहेत.