एकट्या बुमराहमुळे टीम इंडियाचे बॉलर बिनकामी? लिटील मास्टर गावसकर यांचा थेट निशाणा

बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील वाद संपता संपत नाही. आता माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी टीम इंडियाच्या बॉलिंग अटॅकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यामुळे फिरकीपटूंसाठी खेळपट्ट्या तयार केल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

एकट्या बुमराहमुळे टीम इंडियाचे बॉलर बिनकामी? लिटील मास्टर गावसकर यांचा थेट निशाणा
भारताची गोलंदाजी तितकी प्रभावी नाही, म्हणूनच...", सुनिल गावसकर खेळपट्ट्यांबाबत असं का म्हणाले?
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 6:07 PM

मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना उरला आहे. या मालिकेत भारताने 2, ऑस्ट्रेलियाने 1 सामना जिंकला आहे. त्यामुळे मालिकेत 2-1 अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे तिन्ही सामने तिसऱ्याच दिवशी संपले. त्यामुळे आयसीसीपासून काही आजी माजी खेळाडूंनी खेळपट्ट्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इंदुरच्या सामन्यानंतर आयसीसीने स्वत:च लक्ष घातलं आहे. टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकल्यानंतर तिसरा सामना गमावल्यानंतर माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटवर निशाणा साधला आहे. गावसकर यांच्या मते, वेगवान गोलंदाजी तितकी चांगली नसल्याने फिरकीपटूंसाठी खेळपट्ट्या तयार केल्या जात आहेत.

“भारतात 20 गडी बाद करणं सोपं नाही. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि कमी अनुभव असलेल्या मोहम्मद सिराजला बाजूला केलं तर भारतात वेगवान गोलंदाजी तितकी चांगली नाही. पण सुक्या खेळपट्ट्यांवर भारत 20 गडी बाद करू शकतो. म्हणून मला वाटतं अशा खेळपट्ट्या तयार केल्या जात आहेत. “, असं सुनिल गावसकर यांनी एका न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितलं.

“वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी यापेक्षा दुसरा पर्याय नाही. जर तुमच्याकडे चांगला बॉलिंग अटॅक असता तर वेगळं काही करण्याची गरज नसती. पण फिरकीपटू ही ताकद आहे त्यामुळेच अशा खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. पाटा खेळपट्ट्या तयार करून तुम्ही फलंदाजांना पुरक खेळपट्ट्या तयार करू शकत नाहीत. या खेळपट्ट्या फलंदाजांची परीक्षा घेतात.”, असं सुनिल गावसकर यांनी पुढे सांगितलं. गेल्या सप्टेंबरपासून जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघात नाही. आयपीएल 2023 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही खेळणं कठीण आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी भारताला चौथा सामना काहीही करून जिंकणं गरजेचं आहे. भारताने चौथा सामना गमावला तर मात्र अंतिम फेरीचं गणित बिघडेल. भारताला श्रीलंका आणि न्यूझीलँड मालिकेवर अवलंबून राहावं लागणार आहे. दोन सामन्यांची ही मालिका आहे.

भारताचा चौथा कसोटी सामना आणि श्रीलंका-न्यूझीलँडचा पहिला सामना 9 मार्चपासून सुरु होत आहे. पुढचा सामना भारताने जिंकला तर प्रश्नच संपला. पण भारत पराभूत झाला तर मात्र न्यूझीलँडला श्रीलंकेला 1-0 वर रोखावं लागेल. म्हणजेच श्रीलंकेने एक सामना जिंकला आणि एक ड्रॉ झाला तरी भारत अंतिम फेरीत स्थान मिळवले

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.