आयपीएलमध्ये झालेली ‘ही’ चूक BCCI पुन्हा करणार नाही, उचललं कठोर पाऊल
बीसीसीआय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबद्दल खूपच गंभीर आहे आणि यावेळी खेळाडूंच्या सुरक्षितेत कोणतीही कमी असणार नाही, याची पुरेपूर काळजी बीसीसीआयकडून घेण्यासंबंधीची तयारी सुरु आहे. (India Tour of England)
मुंबई : कोरोना व्हायरसच्या मैदानातल्या एन्ट्रामुळे आयपीएलचा (IPL 2021) 14 वा मोसम पुढे ढकलावा लागला. परंतु बीसीसीआय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबद्दल तसंच इंग्लंड दौऱ्याबद्दल (WTC) खूपच गंभीर आहे आणि यावेळी खेळाडूंच्या सुरक्षितेत कोणतीही कमी असणार नाही, याची पुरेपूर काळजी बीसीसीआयकडून घेण्यासंबंधीची तयारी सुरु आहे. त्यासाठी बोर्डाने महत्त्वपूर्ण पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाला इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे. हा सामना 18 जून ते 22 जून दरम्यान खेळला जाईल. यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाच कसोटी सामनेदेखील खेळणार आहे. तथापि, बीसीसीआय अजूनही यूके सरकारकडून तसंच आयसीसीकडून अधिकृत आरोग्य नियमावलीची वाट पाहत आहे. (team india player to get tested at home before flying off england tour)
बीसीसीआय मोठी पावलं उचलण्याच्या तयारीत
बीसीसीआयने खूप प्रयत्न करुनही आयपीएलच्या 14 व्या मोसमात कोरोना विषाणूने शिरकाव केला. बायो बबलमध्ये आयोजित या स्पर्धेत, कोरोनाने कसा प्रवेश केला याचा शोध घेण्याचा बीसीसीआय प्रयत्न करत आहे. आयपीएलमध्ये घडलेल्या घटना डोळ्यासमोर ठेऊन बीसीसीआय इंग्लंड दौर्यासाठीची खेळाडूंची सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी मोठी पावले उचलत आहे.
मुंबईत दोन आठवड्यांसाठी सगळे खेळाडू क्वारन्टाईन?
क्रिकजबच्या रिपोर्टनुसार, इंग्लंडला जाण्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडू आणि कुटुंबीयांना दोन आठवड्यांसाठी मुंबईत क्वारन्टाईन ठेवण्याच्या विचारात बीसीसीआय आहे. मुंबईत राहणाऱ्या खेळाडूंना यामधून एका अटीवर सूट मिळू शकते, ती म्हणजे आपल्या घरी एक आठवड्यासाठी ते आयसोलेट होतील.
इंग्लंडला जाणाऱ्या 90 टक्के खेळाडूंनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. या सर्वांना कोव्हिशिल्ड लस देण्यात आली आहे. या लसीचा दुरा डोस खेळाडू इंग्लंडमध्ये घेण्याची शक्यता आहे. जर इंग्लंडमध्ये लसीची व्यवस्था झाली नाही तर बीसीसीआय स्वतः लसची व्यवस्था करेल.
घरीच कोरोना टेस्ट
त्याशिवाय इंग्लंडला जाणारे सर्व खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यांच्या त्यांच्या घरी आरटीपीसीआर चाचणी घेण्यात येईल असा निर्णयही बीसीसीआयने घेतला असल्याची माहिती पुढे येत आहे. यासाठी, बोर्ड व्यवस्थापक प्रत्येकाच्या घरी वैद्यकीय पथक पाठवेल आणि घराच्या प्रत्येक सदस्याची तपासणी करेल. या चाचण्या येत्या काही दिवसांत घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
(team india player to get tested at home before flying off england tour)
हे ही वाचा :
असं काय झालं की ख्रिस गेल धाय मोकलून रडायला लागला? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
रॉबिन उथप्पाच्या बायकोचा ‘आठवणीतला फोटो’, धोनीची पत्नी साक्षी म्हणते…