Ajinkya Rahane | चाहत्यांकडून कर्णधारपदाचा आग्रह, अजिंक्य रहाणेची विराट कोहलीबाबत ‘चतूर’ कमेंट

अजिंक्य रहाणेने (Ajinknya Rahane) आपल्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवून दिला. यानंतर रहाणेला कसोटीमध्ये कर्णधार करावं, अशी मागणी करण्यात येत आहे.

Ajinkya Rahane | चाहत्यांकडून कर्णधारपदाचा आग्रह, अजिंक्य रहाणेची विराट कोहलीबाबत 'चतूर' कमेंट
अजिंक्य रहाणे
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 7:30 PM

मुंबई :विराट कोहली (Virat Kohli) फार चतुर कर्णधार आहे. तो मैदानात अचूक आणि योग्य निर्णय घेतो. स्पिनर्सना गोलंदाजी द्यायची की नाही, यासंदर्भात तो माझ्याशी चर्चा करतो. मी सांगितलेल्या सुचनांचं तो आदर करतो. अश्विन (Ravichandran Ashwin) आणि जाडेजाच्या (Ravindra Jadeja) गोलंदाजीवर स्लिपमध्ये मी चांगली फिल्डिंग करतो, असं विराटला वाटतं. त्याला माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्याच्या अपेक्षांची पूर्ती करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असतो, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा उपकर्णधार अंजिक्य रहाणेने (Ajinkya Rahane) दिली. विराट कर्णधार म्हणून कसा आहे, याबाबत त्याला प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर त्याने हे उत्तर दिलं. (team india virat kohli smart captain, said ajinkya rahane)

अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत नवख्या खेळाडूंसह रहाणेने टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवून दिला. यानंतर विराटऐवजी रहाणेला कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार करावा, अशी मागणी सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

संघातील स्थानाबाबत काय म्हणाला?

“प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास, माझं संघातील स्थान धोक्यात असल्याचं मला केव्हाच वाटलं नाही. कॅप्टन आणि टीम मॅनेजमेंटने माझ्यावर नेहमीच विश्वास दाखवला आहे. काही मालिकेत खेळाडू अपेक्षित कामगिरी करत नाही. याचा अर्थ तो फ्लॉप झाला, असं होत नाही. फलंदाजाला कमबॅक करण्यासाठी एका चांगल्या आणि मोठ्या खेळीची आवश्यकता असते”, असंही रहाणेने स्पष्ट केलं. क्रिकेट कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहिल्यानंतर तुला तुझं स्थान धोक्यात असल्याचं जाणवलं का, या प्रश्नावर रहाणेने वरील उत्तर दिलं.

विराटसोबतच्या नात्याबाबत काय म्हणाला?

“माझ्यात आणि विराटमध्ये उत्तम तालमेल आहे. विराटने वेळोवेळी माझ्या फलंदाजीचं कौतुक केलं आहे. टीम इंडियाला विजयी करण्यासाठी आम्ही परदेशात स्मरणात राहतील, अशी खेळी केली आहे. विराट चौथ्या आणि मी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यायचो. त्यामुळे आमच्या अनेक पार्टनरशीप झाल्या. आम्ही नेहमीच एकमेकांचा सन्मान करतो. पीचवर एकत्र असताना आम्ही विरोधी संघाच्या गोलंदाजीबाबत आम्ही चर्चा करतो. दोघांपैकी जेव्हा कोणीही बेजबाबदार शॉट मारतो, तेव्हा आम्ही एकमेकांना सावध करतो”, असंही रहाणेने स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या : 

Ajinkya Rahane | विराट आणि अजिंक्यमध्ये कॅप्टन्सीसाठी टक्कर? काय म्हणतो अजिंक्य !

 #IndiavsEngland2021 | आत्मविश्वासाने भरलेल्या टीम इंडियाचं इंग्लंडविरोधात काय होणार?

कसोटी कर्णधार म्हणून योग्य कोण, अजिंक्य की विराट? पाहा दोघांची आकडेवारी

(team india virat kohli smart captain, said ajinkya rahane)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.