टीम इंडियाचा माजी बडा खेळाडू सापडला मोठ्या अडचणीत, फसवणुकीच्या आरोपाखाली FIR दाखल
टीम इंडियाच्या एका माजी, बड्या खेळाडूला मोठा धक्का बसला आहे. तो मोठ्या अडचणीत सापडला आहे. भारतीय संघातील या वेगवान गोलंदाजावर फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिरूअनंतपुरम | 24 नोव्हेंबर 2023 : टीम इंडियाच्या एका माजी, बड्या खेळाडूला मोठा धक्का बसला आहे. तो मोठ्या अडचणीत सापडला आहे. भारतीय संघातील या वेगवान गोलंदाजावर फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो खेळाडू म्हणजे, माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत. आपल्या खेळाच्या कारकिर्दीपेक्षा, श्रीसंत हा अनेक वादांमुळेच जास्त चर्चेत राहिला आहे. आता तो पुन्हा एकदा नव्या वादात अडकला आहे. केरळ पोलिसांनी एस. श्रीसंत आणि अन्य दोघांविरोधात FIR दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या कन्नूर जिल्ह्यामधील एका व्यक्तीने एस.श्रीसंत आणि इतर दोघा व्यक्तींविरोधात फसवणूकीची तक्रार दाखल केली होती. त्याच तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एस. श्रीसंत आणि इतर दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात श्रीसंत याला तिसरा आरोपी म्हणून जाहीर करण्यात आलं आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
संपूर्ण प्रकरण आहे क्रिकेट ॲकॅडमीशी संबंधित
तक्रारदार व्यक्ती, सरीश गोपालन हे कन्नूर जिल्ह्यातील (Kannur) चूंडा येथे राहतात, त्यांनीच श्रीसंत आणि इतर दोघांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. 25 एप्रिल 2019 पासून ते आत्तापर्यंत आरोपी राजीव कुमार आणि वेंकटेश किनी या दोघांनी माझ्याकडून एकूण 18.70 लाख रुपये उकळले. कर्नाटकच्या कोल्लूरमधअये खेळाशी संबंधित एक ॲकॅडमी उघडू आसा दावा आरोपी राजीव आणि वेंकटेश यांनी केला होता. त्यामध्ये भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत हीही भागीदार आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. या ॲकॅडमीमध्ये पार्टनर बनवण्याचं आश्वासन सरीश यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी त्यामध्ये पैशांची गुंकवणूक केली. पण त्यानंतर ॲकॅडमीच्या नावाखाली केवळ पैसे उकळण्यात आले. यात श्रीसंतचाही सहभाग असल्याचा आरोप सरीश गोपालन यांनी केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी श्रीसंतला आरोपी घोषित केलं आहे.
जेव्हा श्रीसंत वर घालण्यात आली होती बंदी
क्रिकेटची कारकीर्द सुरू झाल्यापासू एस. श्रीसंत हा बऱ्याच वेळा वादत सापडला आहे. आयपीएल 2013 मध्ये कथित स्पॉट फिक्सिंगसाठी एस. श्रीशांतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. पण 2020 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) लोकपालांनी त्याच्यावर घातलेली बंदी सात वर्षांपर्यंत कमी केली. यानंतर केरळसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यात श्रीशांतला यश आले. सध्या श्रीशांत लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) 2023 मध्ये भाग घेत आहे. एस. 2007 टी-20 आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत श्रीशांत विजयी भारतीय संघाचा भाग होता. 2007 च्या T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये श्रीसंतने मिसबाह-उल-हकचा अफलातून कॅच घेतला होता, भारतीय क्रिकेट चाहते तो कॅच कधीही विसरू शकत नाहीत. श्रीशांतने भारतासाठी 27 कसोटी, 53 एकदिवसीय आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. घेतला. या काळात त्याने एकूण 169 विकेट घेतल्या.
श्रीसंतचा आयपीएल रेकॉर्ड
आयपीएलमध्ये एस श्रीशांतने किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) कडून पदार्पण केले. यानंतर त्याने कोची टस्कर्स आणि राजस्थान रॉयल्स (RR) साठी T20 लीगमध्ये भाग घेतला. 44 आयपीएल सामन्यांमध्ये 29.9 च्या सरासरीने श्रीशांतच्या नावावर 40 विकेट आहेत.