Special Story | मोहम्मद शमी, उमेश यादव, केएल राहुल आणि रवींद्र जाडेजा जायबंदी, कसोटी की दुखापतीची मालिका?

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाचे अनेक खेळाडूंना दुखापतीमुळे कसोटी मालिकेला मुकावे लागले आहे. या दुखापतीमुळेच इतर नव्या खेळाडूंना संधीही मिळाली.

Special Story | मोहम्मद शमी, उमेश यादव, केएल राहुल आणि रवींद्र जाडेजा जायबंदी, कसोटी की दुखापतीची मालिका?
टीम इंडियाचे दुखापतग्रस्त खेळाडू
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 11:33 AM

सिडनी : प्रत्येक खेळाडू आपल्या कारकिर्दीत दुखापतग्रस्त होतोच. दुखापतीमुळे संबंधित खेळाडूला त्या त्या मालिकेला मुकावे लागते. या दुखापतीमुळे त्या खेळाडूचे वैयक्तिक नुकसान होते. पण दुखापतग्रस्त खेळाडू हा स्टार प्लेअर असला तर त्याचा झटका संघालाही बसतो. टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असंच काहीसं झालंय.(team indias player ravindra jadeja umesh yadav k l rahul and mohammed shami  injured during Australia tour 2020 21)

आयपीएलच्या 13 व्या पर्वानंतर (IPL 2020) टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौरा नियोजित होता. आयपीएलपासून टीम इंडियाचे खेळाडू विशेषत: गोलंदाज दुखापतग्रस्त होऊ लागले.यामध्ये भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) सुरुवात केली. दुखापतीमुळे त्याला आयपीएलला मुकावे लागले. यामुळे त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नाही.

यानंतर अनुभवी गोलंदाज इशांत शर्मालाही (Ishant Sharma) दुखापतीने ग्रासले. इशांत टीम इंडियाचा महत्वाचा आणि ऑस्ट्रेलियातील हुकमाचा एक्का. त्यामुळे टीम इंडिया त्याला खेळवण्यासाठी आग्रही होती. दुखापतीमुळे इंशातला कांगारुंविरोधात पहिल्या 2 कसोटीत खेळता आले नाही.

इशांत दुखापतीतून सावरेल. तो पुन्हा कमबॅक करेल, अशी सर्व भारतीय चाहत्यांना आशा होती. इशांतची उर्वरित 2 कसोटींसाठी निवड करण्यात आली. पण शेवटी ज्याची भिती तेच झालं. इशांत शर्माही दुखापतीतून सावरु शकला नाही. तो ही कसोटी मालिकेआधीच बाहेर झाला.

एकदिवसीय आणि टी 20 मालिकेनंतर बॉर्डर गावसकर मालिकेला (Border Gavskar Trophy)  सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने निराशााजनक कामगिरी केली. भारताचा लाजीरवाणा पराभव झाला. भारताला या पराभवासह दुहेरी झटका लागला.

मोहम्मद शमीला (Mohammed Shami)  दुखापत झाली. अॅडिलेड कसोटीतील दुसऱ्या डावात शमीला पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर दुखापत झाली. परिणामी शमीला कसोटी मालिकेबाहेर व्हावे लागले.

या दुखापतीच्या मालिकेला पूर्णविराम मिळालाच नाही. उलट आणखी खेळाडूंना दुखापत झाली. पहिल्या सामन्यात भारताला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. मात्र मेलबर्नच्या दुसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक केलं. सर्व टीम इंडियासाठी चांगलं घडत होतं. मात्र अघटित घडलंच.

गोलंदाज उमेश यादवला (Umesh Yadav) गोलंदाजीदरम्यान त्रास जाणवू लागला. उमेशला पहिल्या डावात दुखापत झाली. यामुळे त्याला दुसऱ्या डावात गोलंदाजी करता आली नाही. उमेशला दुखापतीचा तीव्र त्रास जाणवू लागला. परिणामी उमेशलाही मालिकेबाहेर व्हावे लागले. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. मात्र त्या विजयात उमेशच्या दुखापतीचा खडा पडला.

भारताचा विजय झाल्याने 4 सामन्यांच्या कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत झाली. त्यामुळे तिसरा सामना चुरशीचा होणार, असं चित्र तयार झालं होत. पहिल्या 2 कसोटींमध्ये केएल राहुलला (K L Rahul) डच्चू मिळाला होता. यामुळे तिसऱ्या सामन्यात तरी संधी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र या तिसऱ्या सामन्याच्या 2 दिवसांआधी केएलला दुखापत झाल्याचं समजलं. अशा प्रकारे केएलही एकही कसोटी न खेळता सीरिजबाहेर झाला.

तिसऱ्या सामन्याला 7 जानेवारीपासून सिडनीत सुरुवात झाली. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजीदरम्यान अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि रिषभ पंतलाही (Rishabh Pant) दुखापत झाली.

जाडेजा आणि पंतचं स्कॅन करण्यात आलं. सुदैवाने पंतची दुखापत फारसगंभीर नसल्याचं निदान झालं. पण जाडेजाच्या अंगठा फ्रॅक्चर झाला. त्या अंगठ्याची हड्डीही सरकली. त्यामुळे जाडेजाही चौथ्या कसोटीतून बाहेर झाला आहे. यामुळे टीम इंडियाच्या डोकेदुखीत चांगलीच वाढ झाली आहे.

नटराजनला दुखापतीचा फायदा

नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यानुसार प्रत्येक घटनेलाही दोन बाजू असतात. चांगली आणि वाईट. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून ते आतापर्यंत टीम इंडियाचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले. मात्र या दुखापतीचा टीम इंडियाला तोटा झाला. मात्र खेळाडूंची दुखापत यॉर्कर किंग थंगारासू नटराजनच्या (T Natrajan) पथ्यावर पडली. इतर खेळाडूंच्या दुखापतीमुळे नटराजनला ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय आणि टी 20 मालिकेत खेळण्याची संधी मिळाली.

मुळात नटराजनची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बॅकअप खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र सुदैवाने त्याला खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी फिरकीपटू वरुण चक्रवर्थी (Varun Chakravarthy) दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे टी 20 मालिकेत चक्रवर्थीच्या जागी नटराजनला संघात समाविष्ठ करण्यात आलं. तसेच त्याला टी 20 मध्ये पदार्पणाची संधीही मिळाली.

नटराजनसोबत हाच प्रकार एकदिवसीय मालिकेत घडला. नवदीप सैनीचा (Navdeep Saini) बॅकअप खेळाडू म्हणून संघात स्थान मिळालं. यानंतर त्याने एकदिवसीय मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली. नटराजनने एकदिवसीय आणि टी 20 मध्ये मिळालेल्या संधीचं सोनं केलं. दरम्यान आता नटराजनला ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळते का, हे पाहणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे.

तसेच या दुखापतीमुळे भारताच्या युवा खेळाडूंना कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. या दुखापतनिमित्ताने शुबमन गिल (Shubaman Gill) , मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि नवदीप सैनी (Navdeep Saini) या नव्या दमाच्या खेळाडूंनी कसोटी पदार्पण केलं. त्यामुळे ही दुखापतीची मालिका कोणासाठी नुकसानीची तर कोणासाठी फायदेशीर ठरली.

संबंधित बातम्या :

Australia vs India, 3rd Test, 4th Day Live : टीम इंडियाच्या दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात, विजयासाठी 407 धावांचं आव्हान

(team indias player ravindra jadeja umesh yadav k l rahul and mohammed shami  injured during Australia tour 2020 21)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.