प्रत्येक सामन्यात चेन्नईची धाकधूक वाढवणारे मुंबईचे पाच खेळाडू
मुंबई : यंदाच्या आयपीएल मोसमात जवळपास प्रत्येक सामना अत्यंत रोमांचक झाला आहे. या मालिकेतील शेवटचा सामना आज (11 मे) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या 2 संघात होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी मैदानात हा सामना खेळवण्यात येणार आहे. मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांना आयपीएलच्या अंतिम सामन्याचा चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या सामन्याकडे […]
मुंबई : यंदाच्या आयपीएल मोसमात जवळपास प्रत्येक सामना अत्यंत रोमांचक झाला आहे. या मालिकेतील शेवटचा सामना आज (11 मे) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या 2 संघात होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी मैदानात हा सामना खेळवण्यात येणार आहे. मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांना आयपीएलच्या अंतिम सामन्याचा चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबई आणि चेन्नई चौथ्यांदा जेतेपदासाठी भिडणार आहेत. आतापर्यंत फायनलमध्ये मुंबईने दोनवेळा तर चेन्नईने एकदा विजय मिळवला. दरम्यान यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघातील हे पाच खेळाडू चेन्नईच्या संघासाठी नक्कीच धाकधूक वाढवू शकतात.
रोहित शर्मा :
आतापर्यंत मुंबई इंडियन्स 5 वेळा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. यातील 4 सामन्यात रोहितने मुंबई संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. रोहितने आतापर्यंत 14 डावात 31.70 च्या सरासरीने 390 धावा केल्या आहेत. टी -20 क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर 3 शतकं आणि 2 अर्धशतकं आहेत. याच कारणामुळे रोहितला ‘हिटमॅन’ म्हणून ओळखले जाते.
हार्दिक पांड्या :
अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने अनेकदा मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला आहे. यंदाच्या मोसमात त्याने कोलकाता नाईट रायडरर्सविरुद्ध 34 चेंडूत 91 धावांचा डोंगर उभारला. हार्दिकने 15 सामन्यात 48.25 या सरासरीने 386 धावा केल्या. त्याने आयपीएलमध्ये 9.32 च्या इकॉनॉमी रेटने 14 खेळाडूंना बाद केलं आहे. त्यामुळेच मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू म्हणून हार्दिकला ओळखले जाते.
राहुल चहल :
मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू राहुल चहर हा चेन्नई सुपर किंग्जसाठी कडवे आव्हान देऊ शकतो. राहुलने यंदाच्या आयपीएलमध्ये 12 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 7.04 च्या इकोनॉमी रेटने 12 विकेट्स घेतल्या आहेत.
लसिथ मलिंगा :
मुंबई इंडियन्स संघाचा आघाडीचा गोलंदाज लसिथ मलिंगा हा चेन्नईसाठी सर्वात मोठा झटका आहे. मलिंगाचा आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहता त्याने 11 सामन्यात 15 विकेट्स घेतल्या आहे. मलिंगाच्या फिरकी गोलंदाजीमुळे मुंबईच्या संघातील प्रमुख गोलंदाज अशी त्याची ओळख आहे.
जसप्रीम बुमराह
जसप्रीत बुमराह याची मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज म्हणून ओळख आहे. त्याने 15 सामान्यात 17 जणांना माघारी पाठवले आहे.