Cricket : क्रिकेटरला होता कर्करोगाचा धोका, शतकी खेळीत चौकार षटकारांची बरसात
झिम्बाब्वेचा कर्णधार चकाबवा 2 आणि मुसाकांडाने 4 धावा करून बाद झाला. वेस्ली मेदवेरेही 19 धावांवर बाद झाला. ज्यावेळी अख्खा संघ संकटात सापडला होता.
मुंबई – अनेक क्रिकेटच्या मॅच (Cricket Match) अनेकदा पाहण्यासारख्या असतात. कारण क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात अशा अनेक मॅच झाल्या आहेत. समोरच्या संघाने 304 धावांचं आव्हान समोर ठेवलं होतं. तसेच सहा धावात दोन गडी बाद झाले होते. पण तरीही झिम्बाब्वेने बांगलादेशचा (Bangladesh) 5 विकेट्सने पराभव केला. त्या सामन्यात खरा ठरला तो म्हणजे सिकंदर रझा. त्याने त्यांच्या कारर्किदीतील एक उत्कृष्ट खेळी केली असं म्हणायला हरकत नाही. कारण त्याने केलेली वादळी खेळी नाबाद ठरली आहे. झिम्बाब्वेच्या (Zimbabwe) या खेळाडूने बांग्लादेशला अक्षरश : गुडगे टेकण्यास भाग पाडले आहे. इनोसंट कायानेही सिंकदर रझा याला चांगली साथ दिली. दोघांच्या शतकी खेळीमुळे हा सामना एकहाती जिंकता आला.
बांगलादेशने 50 षटकांत 303 धावा केल्या
हरारे येथील मैदानात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 50 षटकांत 303 धावा केल्या. विशेष म्हणजे बांग्लादेशच्या देखील दोन विकेट पडल्या होत्या. सुरुवातीच्या चारही चांगल्या फलंदाजांनी अर्ध शतक झळकावलं. कर्णधार तमीम इक्बालने 62 धावा केल्या. लिटन दासने 81, एनामुल हकने 73 आणि मुशफिकर रहीमने 52 धावा केल्या. त्यामुळे झिम्बाब्वेसमोर डोंगरासारखे लक्ष्य उभे राहिले. झिम्बाब्वेच्या खेळाडूंना हे लक्ष्य पुर्ण होईल का याची थोडी शंका होती. परंतु इनोसंट काया सिंकदर रझा यांना सापडलेला सुर थेट विजय देऊन गेला.
झिम्बाब्वेची सुरुवात
झिम्बाब्वेचा कर्णधार चकाबवा 2 आणि मुसाकांडाने 4 धावा करून बाद झाला. वेस्ली मेदवेरेही 19 धावांवर बाद झाला. ज्यावेळी अख्खा संघ संकटात सापडला होता. त्यावेळी इनोसंट काया सिंकदर रझा या जोडीने धावसंख्या उभारली. इनोसंटने 66 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.सिकंदर रझाने ५७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. दोघांमध्ये शतकी भागीदारी पुर्ण झाल्यानंतर दोघांनी बांग्लादेशच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. सिकंदर रझाने अवघ्या 81 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. सिकंदर रझा नुकताच मोठ्या आजारातून बरा झाला आहे. सिकंदर रझाला गेल्या वर्षी बोन मॅरोमध्ये संसर्ग झाला होता. सिकंदरला कर्करोग होण्याचा धोका होता पण सुदैवाने तसे झाले नाही आणि आता हा खेळाडू आपल्या संघासाठी सामने जिंकत आहे.