BCCI: या माजी खेळाडूची निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता
या खेळाडूचं निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी नाव निश्चितं
मुंबई : टीम इंडियाचा (Team India) विश्वचषक स्पर्धेतील (World cup) सेमीफायनलच्या अंतिम फेरीत पराभव झाल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) बदल करणार असल्याचं सुचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर टीम इंडियामध्ये सध्या अनेक बदल पाहायला मिळत आहेत. त्याचवेळी बीसीसीआयने निवड समिती बरखास्त केली होती. कारण निवड समितीने दोनवेळा विश्वचषक स्पर्धेसाठी टीम पाठवली होती. परंतु खेळाडूंनी खराब कामगिरी केल्यामुळे निवड समिती बरखास्त केल्याचं कारण समोर आलं होतं.
T20 फॉरमॅटमधील टीममध्ये बदल करण्यात येणार आहे. ज्या खेळाडूंची खराब कामगिरी राहिली आहे, अशा खेळाडूंना आणि वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. त्यामुळे पुढचा T20 फॉरमॅटमधील कर्णधार हार्दीक पांड्या असेल अशी चर्चा सुद्धा सोशल मीडियावर सुरु आहे.
मागच्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या निवड समितीचा अध्यक्ष कोण असणार अशी चर्चा सुरु आहे. बीसीसीआयने अर्ज देखील मागवले होते. टीम इंडियाचे अनेक दिग्गज माजी खेळाडूंनी त्यासाठी अर्ज दाखल केला आहे. पण निवड समितीने वेंकटेश प्रसाद याचं नाव फायनल केलं असल्याची इनसाइडस्पोर्ट्स माहिती दिली आहे. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीत वेंकटेश प्रसादचं नाव निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी जाहीर करण्यात येईल.