Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup : प्रतिक्षा संपली, तब्बल 1021 दिवसानंतर विराट ‘फॉर्म’मध्ये, मॅचच बदलून टाकली

नेहमीप्रमाणे विराट कोहलीने स्पीचवर टिकून राहण्यासाठी धिम्या गतीने सुरवात केली मात्र, अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्यांची बॅट अशी तळपली की गोलंदाजांनी तोंडात बोटे घातली. कारण 32 बॉलमध्ये अर्धशतक तर 53 बॉलमध्ये त्याने शतक पूर्ण केले. म्हणजे दुसरे अर्धशतक केवळ 21 बॉलमध्ये पूर्ण केले होते. सुरवातीला 11 बॉलमध्ये त्याच्या केवळ 10 धावा होत्या.

Asia Cup : प्रतिक्षा संपली, तब्बल 1021 दिवसानंतर विराट 'फॉर्म'मध्ये, मॅचच बदलून टाकली
विराट कोहली
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 10:01 PM

दुबई :  (Asia Cup) अशिया कप स्पर्धेत तरी (Virat Kohli) विराट कोहलीचा फॉर्म वापस येणार का नाही अशी अवस्था पहिल्या दोन सामन्यानंतर झाली होती. शिवाय या आघाडीच्या फलंदाजाकडून भारतीय प्रेक्षकांना मोठी अपेक्षा कायम राहिलेली आहे. अशिया स्पर्धेतील T20 च्या सामन्यात आज भारतीय टीम ही अफगाणिस्तान विरोधात मैदनात उतरली होती. शिवाय कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडियाचे काय होणार याची चिंता प्रत्येक भारतीयाला होती. पण ऐन वेळीच फलंदाज विराट कोहली याचा फॉर्म वापस आला आणि सर्वच चिंता ह्या मिटल्या आहेत. या सामना केवळ (Indian Team) भारतीय टीमसाठीच नाही वैयक्तिक विराट कोहलीसाठी तेवढाच महत्वाचा राहिलेला आहे. कारण 70 वे शतक ठोकून तब्बल 1021 दिवसांचा कालावधी लोटला होता. त्यानंतर आज त्याला दुबईत सूर गवसला असून केवळ 53 बॉलमध्ये त्याने शतक ठोकले आहे.

अशी राहिली विराटची फटकेाबाजी

नेहमीप्रमाणे विराट कोहलीने स्पीचवर टिकून राहण्यासाठी धिम्या गतीने सुरवात केली मात्र, अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्यांची बॅट अशी तळपली की गोलंदाजांनी तोंडात बोटे घातली. कारण 32 बॉलमध्ये अर्धशतक तर 53 बॉलमध्ये त्याने शतक पूर्ण केले. म्हणजे दुसरे अर्धशतक केवळ 21 बॉलमध्ये पूर्ण केले होते. सुरवातीला 11 बॉलमध्ये त्याच्या केवळ 10 धावा होत्या. मात्र, त्यानंतर त्याच्या खेळाची शैलीच बदलली आणि त्याच्या फलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तान समोर धावांचा डोंगर उभा राहिला आहे. आठव्या ओव्हरमध्ये विराट कोहलीने मोहम्मद नबीच्या ओव्हरमध्ये षटकार लगावला आणि त्यानंतर त्याची फलंदाजीचा अंदाज बदला होता.

आठव्याच ओव्हर मिळाले होते जीवनदान

ज्या ओव्हरपासून विराट कोहलीने आक्रमक बॅटींगला सुरवात केली. त्याच आठव्या ओव्हरमध्ये मोहम्मद नबीच्या ओव्हरमध्ये कॅच आऊट करण्याची संधी इब्राहिम जारदान जवळ होती मात्र, सीमारेषावरील कॅच त्याला पकडता आला नाही. त्या ओव्हरमध्ये अफगाणिस्तान विराट आऊट करण्याची संधीच सोडली नाहीतर पूर्ण सामन्याचेच चित्र बदलून गेले.

2019 मध्ये ठोकले होते शतक

कोहलीने नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध डे-नाईट कसोटी सामन्यात शेवटचे शतक झळकावले होते, परंतु त्यानंतर त्याला सूरच गवसला नव्हता. त्यानंतर गेल्या एक वर्षापासून त्याच्या बॅटमधून धावा येणं बंद झालं होतं. अशा परिस्थितीत आशिया कप आणि त्यानंतर वर्ल्ड कपमध्ये त्याची निवड होण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, पण कोहलीने स्पर्धेच्या सुरुवातीलाच दोन अर्धशतके झळकावत पुनरागमनाचा मार्ग स्वीकारला आहे. त्याच्या खेळीमुळेच भारत मोठ्या धावसंख्येने जिंकणार असे चित्र आहे.

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.