India vs Australia 2020 | विराटवर कर्णधार पदाचा कोणताही दबाव नाही, सलग दुसऱ्या पराभवानंतर टीकेचा धनी झालेल्या कोहलीची हरभजनकडून पाठराखण

ऑस्ट्रेलियाने 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

India vs Australia 2020 | विराटवर कर्णधार पदाचा कोणताही दबाव नाही, सलग दुसऱ्या पराभवानंतर टीकेचा धनी झालेल्या कोहलीची हरभजनकडून पाठराखण
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 8:07 PM

सिडनी : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 51 धावांनी विजय (India vs Australia 2020) मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकाही जिंकली. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी निर्विवाद आघाडी घेतली. सलग दोन पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) सोशल मीडियावरुन तसेच माजी खेळाडूकडून टीका करण्यात आली. या पराभवांमुळे विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. दरम्यान टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) विराटच्या मदतीला धावून आला आहे. हरभजनने विराटची पाठराखण केली आहे. there is no pressure on virat kohli for the captaincy said former india player harbhajan singh

हरभजन काय म्हणाला?

“विराटवर कर्णधार पदाचा कोणताही दबाव नाही. कर्णधारपद हे विराटसाठी डोकेदुखी ठरतंय, असं मला वाटत नाही. विराट सर्व आव्हानांसाठी सज्ज असतो. तो सर्व आव्हानांना हसत हसत सामोरा जातो. तो प्रत्येक बाबतीत आघाडीवर आहे. प्रत्येक गोष्टीचं तो नेतृत्व करतो. विराट सर्वांसाठी उत्तम आदर्श आहे”, असं हरभजन म्हणाला. “कर्णधारपदाचा विराटच्या खेळावर परिणाम होत आहे असे मला वाटत नाही. एकटा एक खेळाडू सामना जिंकवू शकत नाही. विजयासाठी सांघिक खेळी महत्वाची असते”, असं हरभजनने नमूद केलं. हरभजन इंडिया टुडेसोबत होता.

हरभजनकडून केएलचं कौतुक

“केएल राहुलने 2 (K L Rahul) सामन्यांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. केएलची ही कामगिरी पाहून आनंद होतोय”, अशा शब्दात हरभजन केएलचं कौतुक केलं. टीम इंडियाला केएल सारख्या आणखी 2-3 फलंदाजांची आवश्यकता आहे. जे सातत्याने चांगली फलंदाजी करतील. ज्यामुळे विराटवरील दबाव थोड्या प्रमाणात कमी होईल. परिणामी विराट आणखी आक्रमकपणे फलंदाजी करु शकेल, असं हरभजनने म्हटलं.

तिसरा आणि शेवटचा सामना 2 डिसेंबरला

या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 2 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाचा शेवट गोड करण्याच्या प्रयत्न असणार आहे. या एकदिवसीय मालिकेनंतर 3 टी 20 सामन्यांची आणि 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020 | कोहलीची कॅप्टन्सी समजणे अवघड, गंभीरचा विराटवर हल्लाबोल

India vs Australia 2020 | अय्यरची निर्णायक विकेट, कोहलीचा अफलातून कॅच, हेनरिक्सने मॅच फिरवली

there is no pressure on virat kohli for the captaincy said former india player harbhajan singh

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.