IND vs BAN: टीम इंडियाचे हे 3 खेळाडू संपूर्ण कसोटी मालिकेत खेळाडूंना पाणी देण्याचं काम करणार ?
कसोटी मालिकेसाठी या खेळाडूंना मिळाली नाही संधी, आता खेळाडूंना देणार पाणी
मुंबई : टीम इंडिया (IND) सध्या बांगलादेशमध्ये (BAN) आहे, टीम इंडियाची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर आता परवापासून कसोटी मालिका (Test Match) सुरु होणार आहे. त्या मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. कारण टीम इंडियाचे अनेक खेळाडू जखमी झाले आहेत. रोहित शर्मा जखमी झाल्यामुळे टीम इंडियाचं नेतृत्व करण्याची संधी केएल राहूलला देण्यात आली आहे. केएल राहूल आणि प्रशिक्षक राहूल द्रविड हे कोणत्या खेळाडूला संधी देणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
टीम इंडियाचा गोलंदाज कुलदीप यादव याला टीम कसोटी मालिकेत संधी मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल यांना टीममध्ये संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याला दोन कसोटीमध्ये खेळाडूंना पाणी देण्याचं काम करावं लागणार आहे.
शार्दुल ठाकुर हा टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज आहे. परंतु बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत उमेश यादव आणि नवदीप सैनी यांनी संधी देण्यात आल्यामुळे शार्दुल ठाकुर या गोलंदाजाला खेळाडूंना पाणी द्यावे लागणार आहे.
केएस भरत हा टीम इंडियाच्या स्कॉडमध्ये आहे. त्याला विकेटकीपर म्हणून टीममध्ये सामिल करण्यात आलं आहे. परंतु ऋषभ पंतला संधी देण्यात आल्यामुळे त्याला सुद्धा टीम इंडियामध्ये संधी मिळालेल्या खेळाडूंना दोन कसोटीमध्ये पाणी देण्याचं काम करावं लागणार आहे.
पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये या खेळाडूंना संधी
केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि नवदीप सैनी.