T20 World Cup: भारत पाकिस्तान यांच्यात फायनल ? या दिग्गज खेळाडूने व्यक्त केली इच्छा
या ऑस्ट्रेलियन स्टारला भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल व्हावी अशी इच्छा आहे
मेलबर्न : टीम इंडिया (Team India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात पहिली मॅच एकदम रोमांचक झाली. शेवटच्या ओव्हरपर्यंत टीम कोण जिंकणार याचं दडपण चाहत्यांना होतं. परंतु आश्विनने विजयी चौकार मारला अन् टीम इंडिया विजयी झाली. विश्वचषक स्पर्धेत आता सेमीफायनलच्या मॅच सुरु झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा (Australia) दिग्गज खेळाडू शेन वॉटसन याला भारत पाकिस्तान यांच्यात शेवटचा सामना व्हावी अशी इच्छा आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हा-जेव्हा मॅच झाली आहे. तेव्हा-तेव्हा दोन्ही बाजूच्या प्रेक्षकांचा संघर्ष पाहायला मिळाला आहे. विशेष म्हणजे दोन्ही टीममधील खेळाडूंचा देखील संघर्ष मैदानात पाहायला मिळाला आहे.
सुरुवातीला न्यझिलंड टीमची पाकिस्तानसोबत मॅच होणार आहे. त्यानंतर इंग्लंड टीमची टीम इंडियाबरोबर मॅच होणार आहे. टीम इंडियाचे अनेक खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.
सुर्यकुमार यादव, विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. दोघांनी विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत चांगली खेळी केली आहे. विशेष म्हणजे सुर्यकुमार यादवने प्रत्येक सामन्यात झटपट धावा केल्या आहेत.