T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलिया टीममधील हा खेळाडू झाला कोरोना पॉझिटिव्ह
आता ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचं प्रकरण उजेडात आलं आहे.
मेलबर्न : विश्वचषक (T20 World Cup 2022) सुरु होण्यापुर्वी टीम इंडियाचा (Team India) महत्त्वाचा गोलंदाज शमी याला कोरोनाचा संसर्ग झाला होता. ज्यावेळी त्याची कोरोनामधून मुक्तता झाली त्यावेळी त्याने सराव सुरु केला होता. विश्वचषक स्पर्धेत तो कशी कामगिरी करेल अशी सगळ्यांना शंका होती. परंतु ऑस्ट्रेलियाविरुध्द (Australia) झालेल्या सरावसामन्यात त्याने चांगली कामगिरी केली. त्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.
आता ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचं प्रकरण उजेडात आलं आहे. मैथ्यू वेड हा ऑस्ट्रेलियाचा खतरनाक फलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे या विश्वचषकात चांगली कामगिरी करेल अशी चाहत्यांना आशा होती. परंतु कोरोनाचा संसर्ग झाल्याने ऑस्ट्रेलियन टीम त्यावर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
बीबीसीआयने जाहीर केल्याप्रमाणे एखाद्या खेळाडू कोरोना झाला असेल, तसेच त्याच्या आरोग्यास्थिती योग्य असेल तर, डॉक्टरांच्या सल्ल्या घेऊन खेळू शकतो. पण ऑस्ट्रेलिया टीम खूप मोठा असा धक्का मानला जात आहे.
इतर खेळाडूंची सुध्दा चाचणी करण्यात येणार आहे. तसेच मैथ्यू वेड हा खेळाडू निगेटिव्ह आल्यानंतर त्याला पुन्हा टीममध्ये खेळवण्यात येणार आहेत. पण सध्या त्याला आराम देण्यात आला आहे.