टीम पेनने आधी पंतला डिवचलं, आता पेनच्या पत्नीचीही ‘वादात’ उडी
मेलबर्न: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटीत भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या विजयाची चर्चा तर झालीच, मात्र विकेटकीपर ऋषभ पंत आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यांच्यातील वाकयुद्धही चांगलंच गाजलं. टीम पेनने रडीचा डाव खेळत भारतीय क्रिकेटपटूंना स्लेजिंग अर्थात अभद्र बोलण्याचा सपाटा लावला […]
मेलबर्न: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटीत भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या विजयाची चर्चा तर झालीच, मात्र विकेटकीपर ऋषभ पंत आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यांच्यातील वाकयुद्धही चांगलंच गाजलं. टीम पेनने रडीचा डाव खेळत भारतीय क्रिकेटपटूंना स्लेजिंग अर्थात अभद्र बोलण्याचा सपाटा लावला होता. त्याला ऋषभ पंतनेही त्याच तोडीचं उत्तर दिलं होतं. आता या वादात टीम पेनच्या पत्नीनेही उडी घेतली आहे.
टीम पेनची पत्नी बोनी पेनने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये ती मुलं आणि ऋषभ पंतसोबत दिसते. बोनीने या फोटोला स्माईलीसह ‘बेस्ट बेबीसीटर’ असं कॅप्शन दिलं आहे. बोनीने मस्करीत ऋषभ पंतकडे आपली मुलं देत फोटो काढले. पेन आणि पंतमधला तणाव दूर करण्याचा प्रयत्न बोनी पेनने यानिमित्ताने केला.
भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाला ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान स्कॉट मारिसन यांनी जेवणाचं निमंत्रण दिलं होतं. त्यावेळी पेनच्या पत्नीने पंतसोबत फोटोसेशन केलं.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनचं चॅलेंज स्वीकारलं असं आयसीसीने ट्विटरवर म्हटलं आहे.
Tim Paine to @RishabPant777 at Boxing Day Test: “You babysit? I’ll take the wife to the movies one night, you’ll look after the kids?”
*Challenge accepted!* ?
(? Mrs Bonnie Paine) pic.twitter.com/QkMg4DCyDT
— ICC (@ICC) January 1, 2019
ऋषभ पंत आणि टीम पेन यांच्यात नेमका वाद काय?
बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत फलंदाजीला आला, त्यावेळी विकेटकीपर टीम पेनने पंतला उद्देशून टीपण्णी करण्यास सुरुवात केली. पेन म्हणाला “वन डे मालिकेसाठी एम एस धोनीची निवड झाली आहे. या मुलाला (पंत) हरिकेन्स (हॉबर्ट) टीममध्ये घ्यायला हवं. त्यांना एका फलंदाजाची गरज आहे. त्यामुळे तुझी (पंत) ऑस्ट्रेलियातील सुट्टीही वाढेल, हॉबर्ट चांगलं शहर आहे. इथं एक चांगलं घर देऊ”
यापुढे जाऊन पेन पंतला म्हणाला, “तू माझ्या मुलांना खेळवू शकशील का? म्हणजे मला माझ्या पत्नीसोबत सिनेमाला जाता येईल. तू माझ्या मुलांवर लक्ष ठेव”
पंतचं पेनला उत्तर
पेनने केलेल्या टीका टिपण्णीला पंतनेही जशास तसं उत्तर दिलं. दुसऱ्या दिवशी पेन फलंदाजीला आला त्यावेळी, पंत विकेटकीपिंग करत होता. पंत म्हणाला, “आज आमच्याकडे एक खास पाहुणा आहे. मयांक, तू कधी टेंपररी कप्तान (हंगामी कर्णधार) पाहिला आहेस का? या कर्णधाराला आऊट करण्याची गरज नाही. हा केवळ बकबकच करु शकतो”