Purple Cap 2022 : पर्पल कॅप युजवेंद्र चहलकडे, जाणून घ्या कोणते खेळाडू आहेत टॉप 10 मध्ये
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) यंदाच्या मोसमात अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे ते गुणांच्याबाबतीत शेवटच्या रांगेत आहेत. अनेक सामन्यात त्यांच्याकडून चांगली खेळी झालेली नाही. मुंबईच्या टीममधील एखादा खेळाडू खेळाला तर दुसरा खेळाडू साथ देत नाही अशी परिस्थिती आहे.
मुंबई – मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) यंदाच्या मोसमात अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे ते गुणांच्याबाबतीत शेवटच्या रांगेत आहेत. अनेक सामन्यात त्यांच्याकडून चांगली खेळी झालेली नाही. मुंबईच्या टीममधील एखादा खेळाडू खेळाला तर दुसरा खेळाडू साथ देत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांना अद्याप एकाही सामन्यात विजय मिळविता आलेला नाही. मागच्या सामन्यात डेवाल्ड ब्रेव्हिस (Dewald Brevis) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यामुळे खेळ अंतिम षटकापर्यंत पोहोचला. परंतु मुंबई इंडियन्स विजय मिळविता आला नाही.
One orange cap, one purple cap, and 2 points too, please. ??#HallaBol | #RRvLSG | #IPL2022 pic.twitter.com/zKJWG4QfRC
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 10, 2022
मुंबईच्या संघाचा अवघ्या बारा धावांनी पराभव झाला
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये सलग 5व्या पराभवानंतर मुंबई इंडियन्स (MI) शेवटच्या स्थानावर कायम आहे. 199 धावांचा त्यांना करता आला नाही. मागच्या सामन्यात त्यांचा 12 धावांनी पराभव झाला. पीबीकेएससाठी सलामीवीर मयंक अग्रवाल आणि शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावा जोडून संघाला चांगली सुरुवात करून दिली. पुढील फलंदाजांनी त्याचा फायदा करून पीबीकेएसला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.
पर्पल कॅप युझवेंद्र चहलकडे कायम
- राजस्थान रॉयल्सचा लेगस्पिनर युझवेंद्र चहल याने यष्टिरक्षकांच्या टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आपली पकड कायम ठेवली आहे आणि त्याचे 11 बळी या हंगामात कोणत्याही खेळाडूसाठी सर्वाधिक बळी आहेत.
- KKR चे उमेश यादव, DC चे कुलदीप यादव आणि RCB चे श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंधु हसरंगा अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असल्याने प्रत्येकी 10 बाद आहेत.
- SRH च्या टी नटराजनने 8 विकेट्स घेतल्या आहेत.
- पंजाब किंग्जच्या राहुल चहरने MI विरुद्धचा सामना एकही विकेट न घेता संपवल्यामुळे टॉप 5 मध्ये प्रवेश करण्याची संधी हुकली.